Authors
मागील आठवड्यातही सोशल मीडियावर अनेक फेक दावे व्हायरल झाले. पाटणा येथील गांधी मैदानावर झालेल्या जनविश्वास रॅलीत जमलेल्या गर्दीची छायाचित्रे असे सांगत काही छायाचित्रे व्हायरल करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याच्या केंद्र सरकारवर टीका केली आहे, असा दावा करण्यात आला. चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांची छायाचित्रे पाठवल्यास सरकार पाचशे रुपये देते, असा दावा झाला. मुकेश अंबानींच्या जन्मदिनानिमित्त जिओकडून सर्व भारतीय युजर्सना 84 दिवसांचे मोफत रिचार्ज दिले जात आहे, असा दावा करण्यात आला. मोदी सरकार सर्व नागरिकांना दररोज 500 रुपये देत आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
ही छायाचित्रे जनविश्वास रॅलीची नाहीत
पाटणा येथील गांधी मैदानावर झालेल्या जनविश्वास रॅलीत जमलेल्या गर्दीची छायाचित्रे असे सांगत काही छायाचित्रे व्हायरल करण्यात आली. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला.
नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारवर केली टीका
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याच्या केंद्र सरकारवर टीका केली आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला.
वाहनांची छायाचित्रे पाठवल्यास सरकार पाचशे रुपये देते?
चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांची छायाचित्रे पाठवल्यास सरकार पाचशे रुपये देते, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
जिओकडून सर्व भारतीय युजर्सना दिले जातेय मोफत रिचार्ज?
मुकेश अंबानींच्या जन्मदिनानिमित्त जिओकडून सर्व भारतीय युजर्सना 84 दिवसांचे मोफत रिचार्ज दिले जात आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
मोदी सरकार सर्व नागरिकांना दररोज 500 रुपये देते?
मोदी सरकार सर्व नागरिकांना दररोज 500 रुपये देत आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा