Authors
Claim
महाराष्ट्रातील कोल्हापुरात एका ट्रकमधून ६३ मुले पकडण्यात आली असून ही मुले रोहिंग्या आहेत.
Fact
महाराष्ट्रातील कोल्हापुरात ट्रकमधून पकडलेली मुले रोहिंग्या नाहीत.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अनेक मुले ट्रकमध्ये दिसत आहेत आणि काही पोलीस त्यांना ट्रकमधून उतरवत आहेत. या मुलांकडे पश्चिम बंगालचे रेल्वे तिकीट सापडले असून ते रोहिंग्या असल्याचा दावा करत हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
Fact Check/ Verification
दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही काही कीवर्डच्या मदतीने गुगल सर्च केले. आम्हाला ‘एबीपी माझा’ च्या यूट्यूब चॅनेलवर १७ मे २०२३ रोजी अपलोड केलेला व्हिडिओ सापडला. व्हायरल व्हिडिओचा काही भाग त्यात आहे.
व्हिडिओनुसार, मुस्लिम मुलांना घेऊन जाणारा ट्रक कोल्हापूर पोलिसांनी अडवला. शिवाय, ही मुले कोल्हापुर जिल्ह्यातील आजरा येथील मदरशात शिकत असून सुट्टीवर गावी गेल्याचे वृत्त आहे.
तपासादरम्यान, आम्हाला १८ मे रोजी ‘इंडिया टीव्ही’च्या वेबसाईटवर प्रकाशित झालेला रिपोर्ट सापडला, ज्यानुसार महाराष्ट्रातील कोल्हापुरात एका ट्रकमध्ये ६३ मुले आढळून आली, जी बिहार आणि पश्चिम बंगालमधून ट्रेनने कोल्हापूरला पोहोचली होती.
पोलिसांचा हवाला देत रिपोर्टमध्ये असे लिहिले आहे की, ही सर्व मुले परिसरातील एका मदरशात शिकतात आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांच्या घरी गेली होती. पोलिसांनी मुलांची तपासणी केली असता सर्व मुलांचे आधार कार्ड आणि ओळखपत्रे आढळून आली. यानंतर मौलानाला मदरशातून बोलावण्यात आले. मौलाना यांच्याकडे या मुलांची नावे, कुटुंबाची नावे आणि इतर माहिती होती. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सुटका करण्यात आलेल्या मुलांची माहिती एका एनजीओलाही दिली असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
शोध घेतल्यानंतर, आम्हाला १८ मे रोजी IANS TV च्या YouTube चॅनेलवर अपलोड केलेला एक व्हिडिओ रिपोर्ट सापडला. त्यानुसार ही मुले जवळपासच्या भागातून आलेली नसून बिहार आणि बंगालमधून आलेली असल्याने ही मुले तस्करीची घटना असल्याचे पोलिसांना सुरुवातीला वाटले. मात्र पोलिसांनी ट्रक थांबवून तपास केला असता हे प्रकरण बाल तस्करीशी संबंधित नसून धार्मिक शिक्षणाशी संबंधित असल्याचे समोर आले. वृत्तानुसार, ही मुले बिहार आणि बंगालमधून महाराष्ट्रातील मदरशांमध्ये शिकण्यासाठी आली आहेत. या रिपोर्टमध्ये कोल्हापूरचे पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांचेही म्हणणे आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी आम्ही कोल्हापूरचे स्थानिक पत्रकार सचिन यांच्याशीही बोललो. त्यांनी सांगितले की, ही मुले कोल्हापुर जिल्ह्यातील आजरा येथील मदरशात शिकण्यासाठी आली होती. या मुलांना एका एनजीओकडे सोपवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथील संबंधित मदरशाचे मौलवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रतिसाद दिल्यावर लेख अपडेट केला जाईल.
Conclusion
अशाप्रकारे, आमच्या तपासात असे स्पष्ट झाले आहे की, महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील मदरशात शिकण्यासाठी जाणाऱ्या मुलांचा व्हिडिओ दिशाभूल करणारा दावा करून शेअर केला जात आहे.
Result: Missing Context
Our Sources
Video Uploaded by ABP Majha Youtube Channel on May 17, 2023
Report Published at India TV on May 18, 2023
Video Uploaded by IANS Youtube Channel on May 18, 2023
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम शुभम सिंग यांनी केले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in