Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
महाराष्ट्र निवडणुकीनंतर टोल टॅक्स आणि दुधाचे दर वाढले आहेत.
Fact
व्हिडीओमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमुळे दुधाच्या दरात वाढ आणि टोल टॅक्सचा उल्लेख करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याद्वारे महाराष्ट्र निवडणुकीनंतर टोल टॅक्स आणि दुधाचे दर वाढल्याचा दावा केला जात आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अमूल कंपनीची काही दुधाची पाकिटे दाखवत आहे आणि म्हणत आहे की, निवडणुकीनंतर वेगवेगळ्या दुधाच्या पॅकेटचे भाव वाढवले आहेत. याशिवाय सदर व्यक्ती व्हिडिओमध्ये टोल टॅक्स वाढवण्याबाबतही बोलत आहे.
व्हायरल दाव्यासह व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये लिहिले आहे, “निवडणूक संपली, रिकव्हरी सुरू झाली” जे महाराष्ट्रात वितरित केले गेले आहेत ते हजारो कोटी आता पूर्ण होतील.

व्हायरल व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यानंतर, आम्हाला दुधाच्या पाकिटावर तारीख ०४.०६.२४ लिहिलेली दिसली. यावरून हा व्हिडिओ जुना असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर आम्ही हा व्हिडिओ वेगवेगळ्या कीवर्डसह शोधला, परंतु आम्हाला हा व्हिडिओ सापडला नाही.

Google वर संबंधित कीवर्ड शोधताना ३ जून २०२४ रोजी प्रकाशित झालेला रिपोर्ट सापडला. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर अमूल कंपनीने दुधाच्या विविध प्रकारांच्या दरात २ रुपयांनी वाढ केली होती, असे यात सांगण्यात आले. याशिवाय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही ३ जूनपासून टोल करात ३ ते ५ टक्के वाढ जाहीर केली होती.

आम्हाला ३ जून रोजी Aaj Tak च्या वेबसाइटवर या संदर्भात प्रकाशित झालेला रिपोर्ट देखील आढळला. लोकसभा निवडणुकीनंतर नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने टोल टॅक्स वाढवण्याची घोषणा केली होती, असेही यात सांगण्यात आले. यावेळी अमूलने २ जूनपासून प्रत्येक पॅकेटच्या किमतीत २ रुपयांनी वाढ केली होती. असेही समजले.

तपासात आम्ही हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की नुकतेच महाराष्ट्रात किंवा कोणत्याही निवडणूक झालेल्या राज्यात दूध दर आणि टोल टॅक्समध्ये वाढ झाली आहे का? या कालावधीत वाढ झाल्याचे दाखवणारा आम्हाला कोणताही रिपोर्ट प्राप्त झाला नाही.
आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दुधाचे दर आणि टोल टॅक्समध्ये वाढ झाली होती, मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर दूध आणि टोल टॅक्समध्ये वाढ झाल्याचा दावा खोटा आहे.
Our Sources
Article Published by AAJ TAK on 3rd June 2024
Article Published by The lallantop on 3rd June 2024
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम रुंजय कुमार यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad S Prabhu
December 2, 2025
JP Tripathi
November 27, 2025
Salman
November 26, 2025