Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथील पुराचा हा व्हिडिओ अलिकडचा आहे.
नाही, हा व्हिडिओ २०२१ पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.
गेटवे ऑफ इंडिया पाण्याखाली गेले असे सांगत एक व्हिडीओ व्हायरल आहे.
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावर पूर आणि पाण्याच्या जोरदार लाटा आदळत असल्याचा एक व्हिडिओ या दाव्यासह शेअर केला जात आहे की ही दृश्ये मुंबईत नुकत्याच झालेल्या पावसाची आहेत.
तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की हा व्हिडिओ बराच जुना आहे आणि किमान २०२१ पासून इंटरनेटवर आहे.
मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या एका आठवड्यापासून सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे मुंबईत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे अनेक शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
व्हायरल व्हिडिओ २९ सेकंदांचा आहे, ज्यामध्ये मुंबईतील ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडियाजवळ मुसळधार पाऊस आणि पूर दिसत आहे. इतकेच नाही तर गेटवे ऑफ इंडियावरही पाण्याच्या जोरदार लाटा आदळताना दिसत आहेत.
व्हायरल दाव्याच्या कॅप्शनसह व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, “गेल्या चार दिवसापासून मुंबई महानगरीत संततधार सुरू आहे. समुद्र प्रचंड खवळलेला पहावयास मिळत आहे अशा स्थितीत आज गेटवे ऑफ इंडिया या स्थळी लाटा प्रचंड आपला उच्छाद मांडताना दिसून येत आहेत.”

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे पूर आल्याच्या दाव्यासह व्हायरल झालेल्या या व्हिडिओची चौकशी करत असताना, आम्ही की फ्रेम्स वापरून रिव्हर्स इमेज सर्च केले आणि आम्हाला हा व्हिडिओ १९ मे २०२१ रोजी NS NOW नावाच्या YouTube अकाउंटने अपलोड केलेला आढळला. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असा दावा करण्यात आला आहे की हा व्हिडिओ २०२१ मध्ये आलेल्या तौते चक्रीवादळाचा आहे.

याशिवाय, आम्हाला १८ मे २०२१ रोजी दुसऱ्या YouTube अकाउंटवरून देखील हा व्हिडिओ अपलोड केलेला आढळला. या व्हिडिओसोबत असलेल्या शीर्षकात, २०२१ मध्ये आलेल्या तौते वादळाबद्दल देखील सांगितले होते. वाचकांच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की तौते वादळ मे २०२१ मध्ये आले होते. त्याचा कर्नाटक, केरळ, गुजरात आणि महाराष्ट्रासह अनेक दक्षिण भारतीय राज्यांवरही परिणाम झाला.

तपासादरम्यान, आम्हाला हा व्हिडिओ २०२१ मध्येच दुसऱ्या YouTube अकाउंटवर अपलोड करण्यात आला असल्याचे आढळले.

तथापि, या काळात आम्हाला व्हिडिओची खरी तारीख आणि तो पहिल्यांदा कधी अपलोड झाला हे कळू शकले नाही.
आमच्या तपासातून हे स्पष्ट होते की मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे पूर आल्याच्या दाव्यासह व्हायरल होणारा व्हिडिओ अलीकडील पावसाचा नाही तर २०२१ पासून इंटरनेटवर आहे.
Our Sources
YouTube video published by NS NOW on 19th May 2021
YouTube video published by DJ WEB SOLUTIONS on 18th May 2021
YouTube video Published by The Global Exhibition on 23rd July 2021
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदी आणि इंग्रजीनेही प्रकाशित केले असून येथे आणि येथे वाचता येईल.)
JP Tripathi
November 27, 2025
Salman
November 26, 2025
Kushel Madhusoodan
November 26, 2025