Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सोशल मीडियावरील एका व्हिडिओच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, मुस्लिमांनी महाराष्ट्रात हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, “मुंबईत झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चा वर खुश होवून झोपू नका. जरा हा कोपरा बघा… तुम्हाला भविष्यातील आव्हानाची कल्पना येईल.” या कॅप्शनखाली हा दावा करण्यात येत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका इमारतीच्या आतून शूट करण्यात आला आहे, जिथे मुस्लिम टोपी घातलेले काही लोक मुख्य गेटवर घोषणा देत आहेत. पोलीस या लोकांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच भगवे झेंडे घेऊन लोकांची रॅली रस्त्यावरून जाताना दिसत आहे.
इतर भाषांमध्येही समान दावे प्राप्त झाले आहेत.

मुस्लिम समुदायाला लक्ष्य करत हा व्हिडिओ फेसबुक आणि ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे. यासह, लोक कॅप्शनमध्ये लिहित आहेत, “महाराष्ट्रातील शांतता दूत (#जिहादी) नी हिंदुत्व रॅलीमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या तत्परतेमुळे हिंदू-मुस्लिम दंगली वाचल्या. पण धर्मनिरपेक्ष लोक त्याना शांततेचे दूत म्हणून पाहत राहतील.”
इन-व्हिड टूलच्या मदतीने व्हायरल व्हिडिओ रिव्हर्स सर्च केल्यावर, आम्हाला 26 एप्रिल 2022 रोजीचे एक ट्विट आढळले, ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओ आहे. ट्विटमध्ये व्हिडिओचे वर्णन आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे काढण्यात आलेली हनुमान शोभायात्रा असे करण्यात आले आहे.
काही कीवर्डच्या सहाय्याने शोध घेतल्यावर, आम्हाला 27 एप्रिल 2022 रोजी द क्विंटचा रिपोर्ट सापडला. व्हायरल व्हिडिओचा स्क्रीनशॉट या रिपोर्टमध्ये पाहता येईल. त्यामध्ये, 24 एप्रिल 2022 रोजी आंध्र प्रदेशातील नेल्लोरमध्ये हनुमान शोभायात्रा काढण्यात आली होती. असे लिहिलेले आढळले.
याबाबत भाजप नेते सुनील देवधर यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओसारखाच एक व्हिडिओ ट्विट करून नेल्लोर येथील हनुमान शोभायात्रेत मशिदीतून दगड आणि बिअरच्या बाटल्या फेकल्याचा आरोप केला होता.
मात्र, या संपूर्ण प्रकरणावर नेल्लोरच्या पोलीस अधीक्षकांचे वक्तव्य नंतर आले, ज्यात त्यांनी हे दावे फेटाळून लावले. ते म्हणाले होते की, “मिरवणूक शांततेत पार पडली. एके ठिकाणी यात्रा मशिदीसमोरून जात असताना डीजेचा आवाज थोडा वाढला होता. जय श्री रामच्या घोषणाही देण्यात आल्या. त्याचवेळी मशिदीच्या आत काही तरुणांनी अल्ला हू अकबरच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. याशिवाय मशिदीच्या आतून दगड किंवा बाटल्या फेकल्या गेल्या नाहीत किंवा कोणतीही हाणामारी झाली नाही.
इंडिया टुडे आणि द हिंदू यांनीही त्यावेळी या व्हिडिओबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. या रिपोर्ट्समध्येही हा व्हिडिओ नेल्लोरचा असल्याचे सांगण्यात आले आहे.
एकंदरीत व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून करण्यात येत असलेला दावा दिशाभूल करणारा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील नसून आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील असून जवळपास एक वर्ष जुना आहे.
Sources
Tweet made by a user on April 26, 2022
Article published by The Quint on April 27,2022
Article published by The Hindu on April 26, 2022
Article published by India Today on April 26, 2022
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Prasad S Prabhu
October 30, 2025
Vasudha Beri
October 24, 2025
Sabloo Thomas
October 24, 2025