मविआ सरकारने मुस्लिमांच्या उदात्तीकरणासाठी चौथीच्या मराठी पुस्तकात ‘ईदगाह’ हा धडा समाविष्ट केल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, महा आघाडी सरकारचा उद्धव ठाकरे शरद पवारचा भीमपराक्रम…. मराठी शाळा अभ्यासक्रमात मुस्लिमांचे उद्दत्तिकरण चालू आहे, वेळीच ठेचला नाही तर आपली ढासळलेली शिक्षण व्यवस्था नामशेष होईल. प्रश्न क्रमांक 2 वाचा ~ ईद ची प्रार्थना कशी चालते याचे वर्णन करा. काँग्रेस राष्ट्रवादी चे सरकार आले की काय होते पाहिलं का?
हा दावा फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Fact Check/Verification
मविआ सरकारने मुस्लिमांच्या उदात्तीकरणासाठी चौथीच्या पुस्तकात ईदगाहचा धडा समाविष्ट केला आहे का याचा शोध घेण्यास सुरुवात केली पण याबाबत कुठेही बातमी आढळून आली नाही. यानंतर आम्ही बालभारतीच्या वेबसाईटला भेट दिली असता आम्हाला चौथीच्या मराठीच्या पुस्तकात ईदगाह हा धडा असल्याचे आढळून आले. मुळात ही कथा हिंदी साहित्यिक मुंशी प्रेमचंद यांची मराठी अनुवादित करुन चौथीच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.
या कथेत हमीद नावाचा अनाथ मुलगा ईदच्या दिवशी स्वतःसाठी खेळणी विकत घेण्याऐवजी आपल्या आजीसाठी सांडसी विकत घेतो. एक मुलगा लहान वयात आपल्या आनंदाचा विचार न करता इतरांच्या सुखाचा विचार करतो हा बोध या कथेतून सांगितला आहे.

या धड्यात एक हृदयस्पर्शी कहाणी वाचायला मिळते, यात मविआ सरकारने मुस्लिमांच्या उदात्तीकरणासाठी केले नसल्याचे स्पष्ट होते. हा धडा पाठ्यक्रमात नेमका कधी समाविष्ट केला गेला आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. पुस्तकाची प्रस्तावना वाचली असता लक्षात आले की, हा धडा 2014 साली समाविष्ट करण्यात आला यावेळी राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार होते व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. यावरुन हे स्पष्ट होते की, ईदगाह हा धडा मविआ सरकारच्या काळात चौथीच्या पुस्तकात समाविष्ट केलेला नाही.

अधिक तपास केला असता, आम्हाला बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्याची बातमी टिव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर आढळून आली. यात पाटील यांनी म्हटले आहे की, हा धडा मुन्शी प्रेमचंद यांच्या साहित्यातून घेण्यात आला असून अभ्यास मंडळानं जी उद्दिष्टं समोर ठेवलीत, त्या अनुषंगानंच तो पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला आहे. मविआ सरकारने मुस्लिमांच्या उदात्तीकरणासाठी हा धडा अभ्यासक्रमात समाविष्ठ केलेला नाही.

Read More: सचिन तेंडूलकरने पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवाला खांदा दिलेला नाही, चुकीचा दावा व्हायरल
Conclusion
अशाप्रकारे, आमच्या तपासणीत हे स्पष्ट झाले की, मविआ सरकारने मुस्लिमांच्या उदात्तीकरणासाठी चौथीच्या पुस्तकात ईदगाह धडा समाविष्ट केलेला नाही हा धडा मागील 7 वर्षापासून पुस्तकात आहे. तसेच या धड्यातून धार्मिक उदात्तीकरण केलेले नाही.
Result: Misleading
Our Sources
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.