शिवजयंतीला कोणतेही निर्बंध न घालण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी शिवजंयती धुमधडाक्यात साजरे करण्याची व प्रशासनाला कोणतेही निर्बंध न घालण्याचे आदेश दिला आहे.

सध्या कोरोनाची तिसरी लाट देशभरात असताना महाराष्ट्रात देखील अनेक निर्बंध आहेत. राज्यातील निर्बंध काही प्रमाणात हटविण्यात आले असले तरी अजून सण उत्सव आणि लग्नसोहळे तथा सार्वजनिक ठिकाणचे अनेक निर्बंध अद्याप आहेत. मागील वर्षी शिवजयतींला कोणतेही निर्बध कठोर असल्याने राज्यात शिवजयंती साधेपणाने व मोजक्याच लोकांच्या उपस्थित साजरी करण्यात आली होती. दरम्यान यावर्षी शिवजयंतीला कोणतेही निर्बंध न घालण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचा मेसेज व्हायरल झाला आहे.
Fact Check/Verification
शिवजयंतीला कोणतेही निर्बंध न घालण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरंच दिले आहेत का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी काही किवर्ड्सच्या मदतीने शोध घेण्यास सुरुवात केली. यासंदर्भात आम्हाला एबीपी माझाची बातमी आढळून आली.
बातमीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

याशिवाय माय महानगरची बातमी देखील आढळून आली ज्यात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने शिवजयंती साजरी करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यावर भाजपने टीका करत ठराविक धर्मांच्या बाबतीतच अशा प्रकारे नियमावली लावण्यात येत असल्याची टीका केली. शिवजयंती साजरी करण्यासाठीची नियमावली राज्याच्या गृह विभागाने प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली होती. आरोग्याचे आणि कोरोनाचे नियम पालन करून शिवछत्रपतींच्या जन्मोत्सवाच्या सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. येत्या शनिवारी 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराज यांची जयंती आहे. गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनीही मान्याता दिली. त्यानुसार शिवज्योती दौडीत 200 जणांना तर शिव जन्मोत्सव सोहळ्यासाठी 500 जणांना उपस्थितीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

याशिवाय आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर गृह विभागाने जारी केलेली नियमावली देखील आढळून आली.

Conclusion
शिवजयंतीला कोणतेही निर्बंध न घालण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याचा दावा खोटा आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचे नियमाचे पालन करुन शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
Result: Misleading/partly False
Sources
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.