Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचा हा फोटो आहे.
नाही, हा फोटो एका व्हिडिओमधून घेतला आहे, जो २०२१ पासून इंटरनेटवर आहे.
सोशल मीडिया आणि अनेक माध्यमांवर एका बंदूकधारीचा फोटो शेअर करण्यात आला होता आणि दावा करण्यात आला होता की हा फोटो पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचा आहे. X आणि फेसबुकवर हा दावा मोठ्याप्रमाणात करण्यात आलाय.
तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की ज्या व्हिडिओमधून हा फोटो काढला गेला आहे तो २०२१ पासून इंटरनेटवर आहे.
मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील बारसन भागात सशस्त्र दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे २६ जणांचा मृत्यू झाला. पहलगाम हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानसोबतचा १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करणे, अटारी एकात्मिक तपासणी नाका बंद करणे आणि पाकिस्तानी नागरिकांसाठी सार्क व्हिसा सूट योजना स्थगित करणे असे कठोर निर्णय घेतले.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये झब्बा-पायजमा घातलेला एक माणूस हातात बंदूक धरून आहे. तथापि, यावेळी त्याचा चेहरा दिसत नाही. हा फोटो सोशल मीडियावर अनेक व्हेरीफाईड युजर्स आणि विशेषतः माध्यमांनी शेअर केला होता आणि दावा केला होता की हा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचा फोटो आहे.
एबीपी माझा, टीव्ही 9 मराठी, लोकसत्ता Live, NDTV मराठी, थोडक्यात, सुदर्शन मराठी आणि लोकशाही मराठी आदी माध्यमांनी आपल्या बातम्यात हा फोटो वापरला असून त्याचे संग्रहण येथे, येथे, येथे, येथे, येथे, येथे आणि येथे पाहता येईल.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचा फोटो असल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल फोटोचा तपास करण्यासाठी, आम्ही रिव्हर्स इमेज सर्च केला आणि २६ ऑक्टोबर २०२१ रोजी एका पाकिस्तानी फेसबुक अकाउंटने अपलोड केलेला व्हिडिओ सापडला. या व्हिडिओमध्ये, व्हायरल फोटोमधील व्यक्ती बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण घेत असल्याचे दिसत आहे.
या ४० सेकंदांच्या व्हिडिओमध्ये, २९ सेकंदांवर, आम्हाला व्हायरल फोटोमध्ये असलेली फ्रेम सापडली. तुम्ही ती खाली पाहू शकता. तथापि, या व्यतिरिक्त आम्हाला व्हिडिओमध्ये इतर कोणतीही माहिती मिळाली नाही.
आमच्या तपासादरम्यान, आम्हाला कोणत्याही विश्वासार्ह रिपोर्टमध्ये असे कोणतेही चित्र आढळले नाही जिथे असे म्हटले आहे की व्हायरल झालेले चित्र सुरक्षा एजन्सींनी प्रसिद्ध केले आहे.
तथापि, सुरक्षा संस्थांनी तिन्ही दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले आहेत, जे अनेक माध्यमांच्या वृत्तांमध्ये देखील समाविष्ट आहेत.
आमच्या तपासात असे दिसून आले आहे की पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी जोडणारा व्हायरल झालेला फोटो २०२१ पासून इंटरनेटवर आहे. तथापि, हा फोटो कधी आणि कुठे काढला गेला हे आम्हाला कळू शकले नाही.
Our Sources
Video uploaded by an Facebook account on 26th oct 2021
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी रुंजय कुमार यांनी केले असून येथे वाचता येईल.)
Runjay Kumar
May 9, 2025
Prasad S Prabhu
May 9, 2025
Prasad S Prabhu
May 7, 2025