Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
नोबेल समितीचे उपनेते अस्ले तोजे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेल शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार आहेत.
Fact
सार्वजनिकरित्या उपलब्ध कोणताही ऑडिओ/ व्हिडीओ पुरावा अस्ले तोजे असे म्हणत असलेला पुष्टी देत नाही. हे विधान चुकीच्या पद्धतीने त्यांच्या तोंडी घालण्यात आल्याचे मीडिया रिपोर्ट मधून स्पष्ट झाले आहे.
नोबेल समितीचे उपनेते Asle Toje यांनी पंतप्रधान मोदींना नोबेल शांतता पुरस्काराचे “प्रबळ दावेदार” म्हणून घोषित केल्याच्या “बातमीने” बुधवारी उशिरापासून भारतातील मेनस्ट्रीम मीडिया आणि सोशल मीडिया इकोसिस्टममध्ये एक तुफान आले. टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाईम्स, CNBC-TV18, OpIndia आणि लोकमत यासह प्रमुख वृत्तपत्रांनी भारतीय पंतप्रधानांवरील तोजे यांच्या कथित विधानाची बातमी प्रसिद्ध केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्सनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आणि अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली.
न्यूजचेकरला आमच्या व्हॉट्सअॅप टिपलाइनवर (+91-99994 99044) सत्यता तपासण्याची विनंती करीत हा दावा प्राप्त झाला आहे.
अस्ले तोजे हे पाच सदस्यीय नॉर्वेजियन नोबेल समितीचे उपनेते आहेत, जी समिती नोबेल शांतता पुरस्कारासाठी पात्र उमेदवाराची निवड करते. ते 2024 पर्यंत या पदावर आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला इंडिया सेंटर फाउंडेशन (ICF) नावाच्या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी तोजे भारतात आले होते.
आम्ही इंडिया सेंटर फाऊंडेशन इव्हेंटमध्ये तोजे यांच्या अलीकडील भाषणाचे फुटेज पाहून शोधला सुरुवात केली, परंतु पंतप्रधान मोदी यांच्या नोबेल साठी प्रबळ दावेदार असण्याबद्दल भाषणादरम्यान किंवा प्रश्नोत्तर सत्रात कोणताही उल्लेख आम्हाला आढळला नाही. त्यांचे संपूर्ण भाषण खाली पाहता येईल:
यानंतर, तोजे यांनी भारतीय माध्यमांना दिलेल्या विविध मुलाखतींचा आम्ही आढावा घेतला. तोजे जरी भारतीय पंतप्रधानांबद्दल खूपसे बोलत असले तरी पंतप्रधान मोदी हे “नोबेल शांतता पारितोषिकाचे सर्वात प्रबळ दावेदार” असल्याचे त्यांनी कुठेही “उघड” केले नाही. कोणत्याही विश्वासार्ह आंतरराष्ट्रीय न्यूज आउटलेटनेही तसे वृत्त दिले नाही.
तोजे यांनी पंतप्रधान मोदींना “नोबेल शांतता पुरस्काराचे सर्वात मोठे दावेदार” म्हटल्याचा दावा काही भारतीय माध्यमांनी केल्यानंतर, इतर अनेक वृत्तवाहिन्यांनी त्यांच्यावर “फेक न्यूज” प्रसारित केल्याचा आरोप केला.
News Laundry ने 16 मार्च 2023 रोजी “Times Now ने नोबेल शांतता पारितोषिकाचे सर्वात मोठे दावेदार म्हणून PM Modi वर खोट्या बातम्या दिल्या” या शीर्षकाचा एक रिपोर्ट प्रकाशित केला. या विषयावर टाइम्स नाऊ, एबीपी आणि इकॉनॉमिक टाइम्सच्या विविध रिपोर्टचे विश्लेषण केले आणि असा निष्कर्ष काढला की “यापैकी कोणत्याही माध्यमाने नोबेल पॅनेलचे सदस्य पुरस्कारासाठी नामनिर्देशित व्यक्तीची किंवा त्यांच्या संभाव्यतेची सार्वजनिकपणे घोषणा करू शकत नाहीत. याची साधी दखलही घेतलेली नाही”
16 मार्च 2023 रोजीच्या एका रिपोर्टमध्ये झी न्यूजने म्हटले आहे की, “…तोजे यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना, नोबेल शांतता पुरस्काराचे दावेदार म्हणून पंतप्रधान मोदींबद्दल एक शब्दही बोललेला नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे यासंदर्भात प्रसिद्ध बातम्या खोट्या आहेत.”
इतर अनेक वृत्त आउटलेट्सने कळवले की तोजेने पीएम मोदींना नोबेल शांतता पारितोषिकाचे सर्वात मोठे दावेदार म्हणून घोषित करण्याचे “स्पष्टपणे नाकारले” असून हे दावे बनावट आहेत. असे रिपोर्ट येथे, येथे आणि येथे पाहिले जाऊ शकतात.
16 मार्च 2023 च्या वृत्तात, द प्रिंटने ICF चेअरमन विभव के. उपाध्याय यांची याबबाबत प्रतिक्रिया घेतली आहे. “भारतीय टीव्ही चॅनेलनी श्री तोजे यांच्या नावे चुकीचा उल्लेख केला आहे. असे त्यांनी कधीच सांगितले नाही. मला आशा आहे की हे चुकून किंवा अतिउत्साहाने झाले असेल, परंतु जर हे जाणीवपूर्वक केले गेले असेल तर तो गुन्हा आहे.” उपाध्याय पुढे म्हणाले की, सनसनाटी बातमीच्या घटकासाठी काही मीडिया आउटलेट्स खोटे मथळे चालवतात असा त्यांचा संशय आहे.
रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की ICF ने ट्विटरवर “खोटी पोस्ट” शेअर केलेल्या काही व्यक्तींची तक्रार दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम शाखा, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आणि ट्विटरला केली आणि अशा पोस्ट काढून टाकण्याची विनंती केली आहे.
याव्यतिरिक्त, BoomLive च्या रिपोर्टमध्ये कार्यक्रम आयोजित करणार्या कोअर कमिटीचा एक सदस्य मनोज कुमार शर्मा यांनी स्पष्टीकरण दिले आहे, तोजे यांनी त्यांच्या माहितीनुसार अशी कोणतीही टिप्पणी केली नाही. शर्मा पुढे म्हणाले की, “मी नोबेल पारितोषिक समितीचे नॉर्वेजियन उपनेते श्री एस्ले टोजे यांच्यासोबत आयआयसीमध्ये आणि काल आयटीसी मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये होतो, जिथे टाईम्स नाऊचे पत्रकार मुलाखत घेण्यासाठी आले होते. श्री तोजे यांनी 14 मार्च रोजी IIC मधील त्यांच्या मुख्य भाषणात किंवा काल रात्री टाइम्स नाऊ पत्रकाराच्या मुलाखतीत हे कधीही सांगितले नाही.”
नोबेल पारितोषिकाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, “2023 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी 305 उमेदवार आहेत, त्यापैकी 212 व्यक्ती आणि 93 संस्था आहेत… नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित व्यक्ती किंवा नामनिर्देशित व्यक्तींची नावे ही 50 वर्षे उलटून गेली तरी जाहीर करता येणार नाहीत.”
न्यूजचेकरने या प्रकरणावरील त्यांच्या प्रतिक्रियेसाठी अस्ले तोजे यांच्याशीही संपर्क साधला आहे. प्रतिक्रिया मिळताच हा लेख अपडेट केला जाईल.
नोबेल समितीचे उपनेते अस्ले तोजे यांनी पंतप्रधान मोदींना नोबेल शांतता पुरस्काराचे “सर्वात मोठे दावेदार” म्हटल्याचा व्हायरल दावा खोटा आहे. तोजे अनेक मुलाखतींमध्ये पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना दिसले असले तरी, सार्वजनिकरित्या उपलब्ध असा कोणताही ऑडिओ/व्हिडिओ नाही जिथे ते असे विधान करताना ऐकले किंवा पाहिले गेले आहेत.
Sources
Report By News Laundry, Dated March 16, 2023
Report By Zee News, Dated March 16, 2023
Report By The Print, Dated March 16, 2023
Report By BoomLive, Dated March 16, 2023
Nobel Prize Website
(हा लेख सर्वप्रथम वसुधा बेरी यांनी न्यूजचेकर इंगजीमध्ये प्रकाशित केला होता)
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Kushel Madhusoodan
June 14, 2025
Prasad S Prabhu
June 13, 2025
Prasad S Prabhu
June 11, 2025