Friday, April 19, 2024
Friday, April 19, 2024

HomeFact CheckPoliticsआदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून मंत्रिपदाचा उल्लेख खरंच हटवला? याचे सत्य जाणून घ्या

आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून मंत्रिपदाचा उल्लेख खरंच हटवला? याचे सत्य जाणून घ्या

(याची तथ्य पडताळणी न्यूजचेकर हिंदीने केली असून हा लेख Shubham Singh यांनी लिहिला आहे)

महाराष्ट्रात दोन दिवसांपासून वेगाने राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच काही वृत्तवाहिन्यांनी बातम्या दिल्या की, आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवला. 

ई सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, ई सकाळ, तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स, दिव्य मराठी, न्यूज १८ लोकमत, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज, सरकारनामा, महाराष्ट्र देशा, थोडक्यात, माय महानगर, महाराष्ट्र टुडे, वेब दुनिया मराठी, देशदूत, द फोकस इंडिया, गेट्स अप बुलेटिन, दैनिक भ्रमर, मंडे टू मंडे न्यूज या सर्वांनी आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवल्याच्या बातम्या दिल्या. त्याचबरोबर अजून काही बातम्यांचा स्क्रिनशॉट खाली जोडत आहे, त्यांनी देखील बातम्या दिल्या आहे.

फोटो साभार : Google Search Result

विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकालानंतर शिवसेनेचे नगरविकास मंत्री ज्येष्ठ नेते ‘नॉट रिचेबल’ असल्याचे समोर आले, त्यांचे समर्थक आमदारही त्यांच्याबरोबर असल्याची माहिती समोर आली. त्यातच आता अनेक वृत्तवाहिन्यांनी बातमी दिली की, आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवला. 

Fact Check/Verification

आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून मंत्रिपदाचा उल्लेख खरंच हटवले आहे, याची तथ्य पडताळणी करण्यासाठी आम्ही ट्विटर खाते ट्रॅकिंग करणाऱ्या स्पूनबिल या ऑनलाईन टूलवर आदित्य ठाकरे यांचे अधिकृत ट्विटर खाते तपासले. त्यावरून असं समजले की, आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माहितीत १४ जुलै २०१७ रोजी बदल केले होते. त्यावेळी त्यांनी मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या आधी लिहिलेला चेअरमन हा शब्द काढून प्रेसिडेंट लिहिले. 

फोटो साभार : Spoonbill

त्याचबरोबर आम्ही ट्विटरवर काही कीवर्ड टाकले. तेव्हा आम्हांला देवांग दवे यांचे २०२० मधील ट्विट मिळाले. २८ ऑगस्ट २०२० मध्ये त्यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता की,”आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या परिचयातून ‘मिनिस्टर फॉर ट्यूरिझम, एनव्हायरनमेंट अँड प्रोटोकॉल, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र” का काढून टाकले?’ या ट्विटबरोबर त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर खात्याचा स्क्रिनशॉटही जोडला आहे. याचा अर्थ तेव्हा देखील आदित्य ठाकरे यांनी मंत्रिपदाचा उल्लेख हटवल्याचा दावा केला गेला होता. तसेच देवांग दवे हे भाजपा महाराष्ट्राचे निवडणूक व्यवस्थापनाचे काम पाहतात.

आम्ही आदित्य ठाकरे यांच्या २०२० मधील आणि आताच्या ट्विटर खात्याची तुलना केली. तेव्हा आम्हांला समजले की, आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटरच्या खात्यात कोणताही बदल केलेला नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, आदित्य ठाकरे यांनी २०२० पासून त्यांच्या ट्विटर खात्यावरील माहितीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 

फोटो साभार : Twitter@DevangVDave, @AUThackeray

सध्या आदित्य ठाकरे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम पाहत आहे. या व्यतिरिक्त आम्हांला राज्यसभेच्या खासदार आणि शिवसेनेच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी २२ जून २०२२ रोजी या संदर्भातील ट्विट केले. आदित्य ठाकरे यांनी ट्विटर माहितीत मंत्रिपदाचा उल्लेख केला नव्हता, अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली.

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवल्याचा केला जाणारा दावा चुकीचा आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवर मंत्रिपदाचा उल्लेख केला नव्हता. 

Result : False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular