Wednesday, January 15, 2025
Wednesday, January 15, 2025

HomeFact CheckPoliticsExplainer: कन्नड मतदारसंघाचा निकाल आणि आकडेवारीत घोळ झाल्याच्या आरोपावरून तापलेले राजकारण नेमके...

Explainer: कन्नड मतदारसंघाचा निकाल आणि आकडेवारीत घोळ झाल्याच्या आरोपावरून तापलेले राजकारण नेमके काय आहे? जाणून घेऊयात

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागला. निकालानंतर पराभूत पक्ष आणि उमेदवारांपैकी बहुतेकांनी आपला निशाणा EVM वर साधला आहे. महाविकास आघाडीने तर याचा जोरदार धडाका सुरु केल्याचे दिसले. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघाचा निकाल आणि आकडेवारीत घोळ झाल्याच्या आरोपावरून तापलेले राजकारण मोठ्याप्रमाणात चर्चेत आहे. या आरोपांनी अवघा सोशल मीडिया व्यापून टाकला आहे. पती विरुद्ध पत्नी अशी लढत, महायुतीतून शिवसेना पक्षाच्या उमेदवार बनलेल्या पत्नीचा विजय, पराभूत पतीचे आरोप, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण तरीही विरोधी पक्षांसाठी EVM वर आरोप करण्यासाठी मिळालेली संधी अशा अनेक पैलूंनी गाजलेल्या या प्रकरणाची माहिती या एक्सप्लेनर मधून आम्ही घेणार आहोत.

निकाल आणि घोळाने तापले वातावरण

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात येणाऱ्या कन्नड विधानसभा मतदारसंघातून रंजनाताई उर्फ संजना हर्षवर्धन जाधव या महायुतीतील घटक असलेल्या एकनाथ शिंदे शिवसेनेच्या उमेदवार निवडून आल्या. त्यांनी आपले पती आणि यापूर्वी अर्थात २००९ आणि २०१४ साली या मतदारसंघातून आमदारकी भोगलेल्या हर्षवर्धन रायभान जाधव यांचा १८२०१ मतांनी पराभव केला. रंजना उर्फ संजना यांना ८४४९२ मते मिळाली.

Explainer: कन्नड मतदारसंघाचा निकाल आणि आकडेवारीत घोळ झाल्याच्या आरोपावरून तापलेले राजकारण नेमके काय आहे? जाणून घेऊयात

हा निकाल लागताच मतदारसंघातील बूथ क्रमांक ८० तळनेर येथील मतांची आकडेवारी हाताने लिहिलेला एक फॉर्म बाहेर आला. ही आकडेवारी एकंदर घोळाचे कारण ठरली आणि सोशल मीडियावर वातावरण तापू लागले.

सर्वप्रथम यासंदर्भात झालेले सोशल मीडियावरील दावे आपण पाहू. सोशल मीडिया युजर्सनी संबंधित मतांची हस्तलिखित माहिती पसरविताना “”कन्नड विधानसभा क्रमांक १०५, तळनेर या गावात एकूण मतदार – ३९६, झालेले मतदान – ३१२, शिवसेना (UBT) – १९४, शिवसेना (शिंदे) – ३२६, अपक्ष (हर्षवर्धन जाधव) – १०४, मतांची बेरीज – १९४+३२६ +१०४ =६२४, EVM वर मुळीच शंका नाही पण या प्रश्नाचे उत्तर कोण देणार?” अशा कॅप्शनचा वापर सुरु केला.

Explainer: कन्नड मतदारसंघाचा निकाल आणि आकडेवारीत घोळ झाल्याच्या आरोपावरून तापलेले राजकारण नेमके काय आहे? जाणून घेऊयात
Courtesy: X@amolpardhi111

अशा पोस्टवरून संशयाचे वातावरण बनत असतानाच राजकीय नेते आणि महाविकास आघाडीने देखील या ऑनलाईन पोस्टच्या सत्रात उडी घेतली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते डॉ. जितेंद्र आवाढ, रोहित पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आदींच्या यासंदर्भातील पोस्ट पाहता येतील.

संबंधित सोशल मीडिया पोस्टमुळे तळनेर गावातील एकूण मतदारसंख्या ३९६ असताना आणि ३१२ जणांनी मतदान केले असताना केवळ तीन उमेदवारांना पडलेल्या मतांची बेरीज ६२४ कशी? असा प्रश्न उपस्थित झाला.

अशा दाव्यांचे लिंक आपल्याला येथे, येथे, येथे आणि येथे पाहता येतील.

फेसबुकवरही असे अनेक दावे झाले असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

तो फॉर्म लिहिला कोणी?

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या संबंधित हस्तलिखित फॉर्म चे आम्ही बारकाईने निरीक्षण केले. दरम्यान मतमोजणी सुरु असताना संबंधित फॉर्म कोणीतरी हाताने लिहिला असल्याचे आणि त्यावर अनेक बेरजाही केल्या असल्याचे आमच्या लक्षात आले. हा फॉर्म व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने यासंदर्भात काही भाष्य केले आहे का? याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

Explainer: कन्नड मतदारसंघाचा निकाल आणि आकडेवारीत घोळ झाल्याच्या आरोपावरून तापलेले राजकारण नेमके काय आहे? जाणून घेऊयात

सर्वप्रथम आम्हाला समजले की आकडेवारीत तफावत असल्याची व्हायरल पोस्ट कन्नड मतदारसंघातील पराभूत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली. त्यांनी जाधव यांना ही बाब कळवली. त्यानंतर जाधव यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांच्या कार्यालयात धाव घेतली. गोरड यांच्याकडे त्यांनी लेखी खुलासा मागितला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले की, आकडेवारी लिहिताना मानवी चूक झाली आहे. आकडा ऐकण्यात चूक होऊन तळनेर बुथ क्रमांक ८० ऐवजी नेवपुर खा. येथील बूथ क्रमांक ८१ वरील संजना जाधव यांना मिळालेली ३२६ मतदानाची आकडेवारी लिहिण्यात आली. त्यामुळे आकडेवारीची एकूण बेरीज करताना तफावत झाली. ही हस्तलिखित आकडेवारी उमेदवारांच्या प्रतिनिधींनीची असून त्या आकडेवारीचा संगणकामधील अद्यावत आकडेवारीशी काहीही संबंध नाही, असा खुलासा गोरड यांनी केला. यासंदर्भात माहिती देणारे हर्षवर्धन जाधव यांच्या व्हिडिओसोबत असलेले ट्विट आम्हाला सापडले.

अधिक माहितीसाठी आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी संबंधित व्हायरल हस्तलिखित फॉर्मशी निवडणूक आयोगाचा काहीच संबंध नसल्याचे आणि अकारण मतमोजणी प्रक्रियेची बदनामी केली जात असल्याचे सांगितले. या व्हायरल दाव्याचे खंडन करणारी पोस्ट छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या माहिती कक्षाने प्रसिद्ध केली असल्याची माहिती देताना निवडणूक आणि मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक झाली असून याबद्दल कुणीही संशय बाळगण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.

Explainer: कन्नड मतदारसंघाचा निकाल आणि आकडेवारीत घोळ झाल्याच्या आरोपावरून तापलेले राजकारण नेमके काय आहे? जाणून घेऊयात

“१०५ –कन्नड या विधानसभा मतदारसंघातील तळणेर मतदान केंद्र क्रमांक ८० मधील मतदान आकडेवारीबाबत समाज माध्यमांवर चुकीची माहिती प्रसारीत केली जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी मांडलेली वस्तूस्थिती अशीः- १०५- कन्नड विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्र क्रमांक ८० (तळनेर- जि.प.शाळा खोली क्रमांक १) बुथवरील मतदार संख्याः- पुरुष मतदार २१६+महिला मतदार-१८०+इतर-०= एकूण-३९६, झालेले मतदान- पुरुष मतदार-१७८+महिला मतदार-१३४+इतर- ०= एकूण ३१२” असे २७ नोव्हेंबर रोजी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलेले आहे.

यासंदर्भात छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे. “उमेदवारांच्या प्रतिनिधींनी लिहिलेली आकडेवारी आणि त्यातील घोळ व्हायरल झाला मात्र खातरजमा न करता अफवा पसरवू नका.” असे आवाहन त्यांनी केले.

पराभूत उमेदवारांचे समाधान नाही

निवडणूक अधिकर्त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे सर्वांचे समाधान झाले आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला.

विजयी उमेदवार रंजनाताई उर्फ संजना हर्षवर्धन जाधव यांनी यासंदर्भात बोलताना आम्हाला विरोधकांनी अकारण संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून तो चुकीचा असल्याचे म्हणणे मांडले आहे.

पराभूत उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्याला हे स्पष्टीकरण मान्य नसून निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. अशी माहिती दिली. तक्रार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळाली.

आणखी एक पराभूत उमेदवाराने नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना हा सर्व महायुतीचा सावळा गोंधळ आहे. तक्रार करूनही काहीच साध्य होणार नाही. यामुळे आम्ही शांत राहिलो आहोत. असे सांगितले.

या प्रकरणावर भाष्य करणारे वृत्त दैनिक लोकमतने वृत्तपत्रात आणि आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

Explainer: कन्नड मतदारसंघाचा निकाल आणि आकडेवारीत घोळ झाल्याच्या आरोपावरून तापलेले राजकारण नेमके काय आहे? जाणून घेऊयात
Courtesy: Lokmat

आम्ही संबंधित लोकमतचे तालुका प्रतिनिधी प्रवीण जंजाळ यांच्याशी बोललो. त्यांनी मतमोजणी सुरु असताना उमेदवारांच्या प्रतिनिधींनीं लिहून घेतलेल्या माहितीवरून झालेला हा गोंधळ असून निवडणूक अधिकाऱ्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. मात्र अद्याप पराभूत उमेदवारांचे समाधान झालेले नसल्याची माहिती दिली. दरम्यान निवडणूक आयोगाने जारी केलेली बुथनिहाय मतदानाची आकडेवारी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली.

Explainer: कन्नड मतदारसंघाचा निकाल आणि आकडेवारीत घोळ झाल्याच्या आरोपावरून तापलेले राजकारण नेमके काय आहे? जाणून घेऊयात

देशाचे लक्ष वेधले

कन्नड मतदारसंघातील विजयी उमेदवार या भाजप नेते रावसाहेब दानवे त्यांच्या कन्या आहेत. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी असल्यातरी कौटुंबिक संघर्षातून राजकीय संघर्षापर्यंतचा त्यांचा प्रवास झाला. पती विरुद्ध पत्नी या लढतीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले होते. तर निकालानंतर झालेल्या चर्चांनी आता कन्नड मतदारसंघातील घडामोडींकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Conclusion

सध्यातरी निवडणूक आयोगाकडे या प्रकरणी थेट तक्रार होऊन तपास होण्याची मागणी होत आहे. तसे झाल्यास या प्रकरणातील निकाल स्पष्ट होऊ शकणार आहे.

Our Sources
Post made on Social Media
Tweet made by District Information Office Chatrapti Sambhaji Nagar
News published by Lokmat Newspaper
Conversation with Election Officer Santosh Gorad
Conversation with Winning Candidate Ranjanatai Harshvardhan Jadhav
Conversation with Defeated Candidate Harshvardhan Jadhav
Conversation with Journalist Pravin Janjal


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular