Saturday, November 16, 2024
Saturday, November 16, 2024

HomeFact Checkफॅक्ट चेक: भाजपा युतीला मतदान द्या, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले? जाणून घ्या...

फॅक्ट चेक: भाजपा युतीला मतदान द्या, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले? जाणून घ्या सत्य काय आहे

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
भाजपा महायुतीला मतदान द्या, असे वंचीत बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Fact

हा दावा खोटा आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाचा संदर्भ बदलून हा दावा करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या एक आठवड्यावर येऊन पोचली आहे. यापार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आणि आघाड्यांमध्ये सोशल मीडियावरील वार जोरदार सुरु झाले आहे. भाजपा युतीला मतदान करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले असल्याचे सांगणारा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

फॅक्ट चेक: भाजपा युतीला मतदान द्या असे प्रकाश आंबेडकर म्हणाले? जाणून घ्या सत्य काय आहे

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे छायाचित्र वापरून बनविण्यात आलेल्या न्यूजकार्डद्वारे हा दावा केला जात आहे. “ज्यांना मतदान द्यायचं नाही त्यांनी भाजपा महायुतीला द्यावं, काँग्रेस आघाडीला देऊ नये. ज्यांना नसेल द्यायचं त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान द्यावं आणि नुसतं मतदान न देता आमदार निवडून द्यावेत.” असा मजकूर त्यावर असून खाली प्रकाश आंबेडकर यांचे नाव आहे. न्यूजकार्डच्या खालील भागात “याला ‘B टीम’ नाही म्हणायचं तर काय म्हणायचं…?” असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काही नरेटिव्ह सुरु आहेत. भाजपची B टीम असे नरेटिव्ह चालवीत असताना त्याला जोडून हा दावा करण्यात आला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

Fact Check/ Verification

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या या दाव्याचा तपास करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम व्हायरल न्यूजकार्ड काळजीपूर्वक पाहिले. यामध्ये आम्हाला ‘राजकीय धुरळा’ असा उल्लेख आढळला. आम्ही त्यादृष्टीने तपास करताना संबंधित नावाने कोणी राजकीय पोस्ट करीत आहे का? याचा शोध संबंधित कीवर्डच्या माध्यमातून घेत असताना आम्हाला @mangeshspa नावाच्या युजरने १३ नोव्हेंबर २०२४ रोजी केलेली एक पोस्ट आढळली.

“वंचितने काँग्रेसचे फेक न्यूज पेडलर @Liberal_India1 व @RajkiyDhurala तसेच काँग्रेसच्या आयटी सेलच्या बऱ्याच सदस्यांवर प्रकाश आंबेडकर आपल्या कार्यकर्त्यांना भाजपला मतदान करा असे सांगत आहेत अशी खोटी बातमी पसरवली म्हणून पोलीस तक्रार दाखल केली.” अशी माहिती आम्हाला वाचायला मिळाली.

@Liberal_India1 या युजरने अशी पोस्ट केल्याचे आमच्या निदर्शनास आले. @RajkiyDhurala हे खाते आम्ही धुंडाळले. दरम्यान आम्हाला या X खात्यावर अशी पोस्ट मिळाली नसली तरी याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारी १२ नोव्हेंबर २०२४ रोजी पोस्ट करण्यात आली असल्याचे आणि मूळ पोस्ट डिलीट करण्यात आली असल्याचे दिसून आले.

फॅक्ट चेक: भाजपा युतीला मतदान द्या असे प्रकाश आंबेडकर म्हणाले? जाणून घ्या सत्य काय आहे
Courtesy: X@RajkiyDhurala

“आमचे लक्ष आमच्या अलीकडील पोस्टपैकी एका चुकीच्या पोस्टकडे वेधले गेले आहे. चुकीच्या माहितीच्या सध्याच्या वातावरणात, आम्ही एक असत्यापित WhatsApp फॉरवर्ड प्रकाशित केले हे खेदपूर्वक आहे. या दुर्लक्षाबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत.” असे यामध्ये लिहिलेले असल्याचे आम्हाला आढळले.

आम्ही यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे काय म्हणणे आहे हे शोधले. आघाडीने आपल्या @VBAforIndia या X खात्यावरून केलेली १२ नोव्हेंबर २०२४ रोजीची पोस्ट आम्हाला मिळाली.

फॅक्ट चेक: भाजपा युतीला मतदान द्या असे प्रकाश आंबेडकर म्हणाले? जाणून घ्या सत्य काय आहे
Courtesy: X@VBAforIndia

“फेक पोस्ट करून प्रकाश आंबेडकर यांच्या विषयी संभ्रम निर्माण करणाऱ्याला तत्काळ अटक करण्यात यावी अन्यथा त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील.” असे या पोस्टमध्ये म्हटलेले आहे.

याचबरोबरीने सकाळ या माध्यमाने यासंदर्भात १३ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध केलेली बातमीही आम्हाला वाचायला मिळाली. बातमीत प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट प्रकाशित करणाऱ्यांविरोधात वंचित आघाडीने कारवाईचा इशारा दिला असल्याचे म्हटले आहे.

फॅक्ट चेक: भाजपा युतीला मतदान द्या असे प्रकाश आंबेडकर म्हणाले? जाणून घ्या सत्य काय आहे

दरम्यान आम्ही वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे त्यांच्याशी बोललो. त्यांनी “एकंदर प्रकार खोटा असून प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणाचा विपर्यास लावून अशा पोस्ट केल्या जात आहेत. असे प्रकार आम्ही खपवून घेणार नसून आवश्यक ती कारवाई केली जात आहे.” असे सांगितले.

ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश आज भाजप आणि काँग्रेसने मान्य केल्यासारखा आहे. आरक्षण हटावच्यासंदर्भातील अंमलबजावणीला सामोरे जायचे असेल तर भाजपा महायुतीला मतदान करा. अशा आशयाचे प्रकाश आंबेडकर यांनी केलेले भाषण अशाप्रकारचे दावे पुढे येण्यास कारणीभूत ठरले आहे. मात्र या भाषणातील मागचा आणि पुढचा संदर्भ बदलून हे दावे करण्यात येत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. लातूर येथे ११ नोव्हेंबर रोजी केलेले आणि आघाडीने live प्रक्षेपित केलेले भाषण असून ते इथे पाहता येईल.

फॅक्ट चेक: भाजपा युतीला मतदान द्या असे प्रकाश आंबेडकर म्हणाले? जाणून घ्या सत्य काय आहे

संबंधित भाषणात १० मिनिटे २५ सेकंदांनंतर आपल्याला प्रकाश आंबेडकर यांनी बोललेले मुद्दे पाहता येतील.

Conclusion

अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने केलेला दावा त्यांच्या भाषणातील संदर्भ बदलून केलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Result: Missing Context

Our Sources
Tweet published by @mangeshspa on November 13, 2024
Tweet published by @RajkiyDhurala on November 12, 2024
Tweet published by @VBAforIndia on November 12, 2024
Facebook post by Balasaheb Ambedkar on November 11, 2024
Conversation with Mr. Siddharth Mokale, Spokesperson, VBA
News published by Sakal on November 13, 2024


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular