Authors
Claim
पुणे पोर्श क्रॅश प्रकरणात गुंतलेल्या किशोरवयीन मुलाचे तो अपघातातून कसा सुटला याबद्दल फुशारकी मारणारे गलिच्छ रॅप गाणे.
Fact
व्हिडिओमध्ये आरोपी किशोरवयीन नाही, तर कंटेंट क्रिएटर आहे.
अनेक सोशल मीडिया युजर्स एक रॅप व्हिडिओ प्रसारित करत आहेत, ज्यामध्ये दावा केला जात आहे की व्हिडिओत तो 17 वर्षीय मुलगा आहे, ज्याच्यावर कथितपणे त्याच्या पोर्श कारने पुण्याच्या दोन तंत्रज्ञांना चिरडल्याचा आरोप आहे, व्हिडिओत तो त्यांच्या मृत्यूची थट्टा करत असल्याचे आणि आपण अपघातातून कसा सुटला याबद्दल फुशारकी मारत आहे.
19 मे रोजी पहाटे 2.30 च्या सुमारास पुण्यातील कल्याणीनगर जंक्शनवर भरधाव वेगाने जाणारी पोर्श कार मोटारसायकलवर आदळली तेव्हा त्याचा ड्रायव्हर वाहन चालवत होता, असे या युवकाने सांगितले आहे. अपघाताच्या वेळी त्याच्यासोबत असलेले दोन मित्रही त्याच्या विधानाशी ठाम आहेत. फॅमिली कार चालकाने आधीच्या निवेदनात दावा केला होता की अपघात झाला तेव्हा तो पोर्श चालवत होता. विशाल अग्रवाल, किशोरचे रियाल्टर वडील, यांनी देखील सांगितले आहे की ती कार चालवणारा ड्रायव्हरच होता.
ट्विटचे संग्रहण येथे पाहता येईल.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Fact Check/ Verification
Newschecker ने प्रथम “Pune Porsche rap teenager” साठी कीवर्ड शोध लावला, आम्हाला व्हायरल व्हिडिओबद्दल अनेक बातम्या सापडल्या, त्या येथे, येथे आणि येथे पाहता येतील. त्यामध्ये असे म्हटले आहे की व्हिडिओत आरोपी किशोरवयीन मुलगा नाही तर एक कंटेंट क्रिएटर आहे.
24 मे 2024 रोजीचा न्यूजलॉन्ड्रीचा रिपोर्ट सांगतो की, “पण व्हिडिओमधील माणूस अजिबात अल्पवयीन नाही. आर्यन देव नीखरा नावाचा हा कंटेंट क्रिएटर आहे, जो इंस्टाग्रामवर क्रिंगिस्टन नावाने त्याचे काम पोस्ट करतो. तो दिल्लीच्या विकास मार्ग रोडवरील नो ग्रॅव्हिटी मीडिया नावाच्या कंपनीत “मेम मार्केटर” असल्याचा दावा करतो… त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये असे म्हटले आहे की त्याला ‘सर्जनशीलता आणि विनोदी व्यक्तिमत्त्वाची आवड आहे,” आरोपीने रॅप गाणे सादर केले होते असे सांगून अनेक माध्यमांनी व्हिडिओबद्दल चुकीचे वृत्त दिले होते असे आमच्या निदर्शनास आले.
यातून एक संकेत घेऊन शोधताना, आम्हाला इन्स्टाग्रामवर कन्टेन्ट क्रिएटरचे खाते सापडले, जिथे तो Cringistaan2 नावाने आहे, परंतु व्हायरल व्हिडिओ हटविला गेला असल्याचे दिसून आले. पुण्यातील कार अपघाताविषयी आक्षेपार्ह रॅप गाणे सादर केल्याने हा क्रिएटर मीडिया स्क्रुटिनीचा शिकार झाला असल्याचे दिसून आले.
तसेच, अल्पवयीन मुलाच्या आईने व्हिडिओ जारी करून स्पष्ट केले की व्हिडिओमधील व्यक्ती तिचा मुलगा नाही. “जो व्हिडिओ प्रसारित केला जात आहे तो माझ्या मुलाचा नाही. तो एक बनावट व्हिडिओ आहे. माझा मुलगा डिटेंशन सेंटरमध्ये आहे,” असे त्याच्या आईने तिच्या मेसेजमध्ये म्हटले आहे.
24 मे 2024 रोजीचा टाईम्स ऑफ इंडियाचा रिपोर्ट सांगतो की, “पुणे पोलिसांनी हा व्हिडिओ बनावट अकाउंटचा असल्याची पुष्टी केली आहे आणि किशोरवयीन मुलाचा त्यात सहभाग नव्हता.” गुन्हे शाखेचे एसीपी सुनील तांबे यांनी खोटे दावे खोडून काढत पुणे पोलिसांच्या स्पष्टीकरणावरील तत्सम रिपोर्ट येथे, येथे, येथे, येथे पाहता येतील.
Conclusion
व्हायरल आक्षेपार्ह रॅप व्हिडिओ हा पुणे पोर्श क्रॅश प्रकरणातील आरोपी किशोरवयीन मुलाचा नाही.
Result: False
Source
Newslaundry report, dated May 24, 2024
Instagram account, Cringistaan2
Times of India report, May 24, 2024
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in