Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckFact Check: राहुल गांधी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये चीनचे संविधान घेऊन जातात का? येथे...

Fact Check: राहुल गांधी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये चीनचे संविधान घेऊन जातात का? येथे जाणून घ्या संपूर्ण सत्य

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
राहुल गांधी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये चीनचे संविधान घेऊन जातात का?
Fact

नाही, हे भारतीय राज्यघटनेचे पॉकेट बुक आहे.

राहुल गांधी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये चीनचे संविधान घेऊन जातात असे प्रश्नार्थक स्वरूपात विचारणारे दावे व्हायरल होत आहेत. राहुल गांधींच्या रॅलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते स्टेजवर भारतीय राज्यघटनेचे लाल रंगाचे पॉकेट बुक हातात धरलेले दिसत आहेत. या फोटोबाबत सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, ज्यामध्ये असे म्हटले जात आहे की, “क्या राहुल गांधी अपने मंच पर चीन का संविधान को लेकर जाते हैं? क्योंकि चीन के संविधान का रंग लाल है”.

जेव्हा आम्ही या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला आढळले की राहुल गांधी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये ईबीसी पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेले भारतीय संविधानाचे पुस्तक खिशात ठेवतात.

भाजपच्या दोन बड्या नेत्यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेले ट्विट आणि केंद्रीय मंत्री पंकज चौधरी यांच्या वक्तव्यानंतर हा प्रश्न सोशल मीडियावर फिरू लागला.

खरं तर, 17 मे ला हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांच्या X अकाउंटवरून एक कोलाज पोस्ट केला होता, ज्यामध्ये राहुल गांधी, भारतीय संविधान आणि चिनी संविधान यांची छायाचित्रे होती. हे कोलाज ट्विट करताना हिमंता बिस्वा सरमा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “भारत के संविधान की मूल प्रति का कवर नीला है. वहीं मूल चीनी संविधान का आवरण लाल है. क्या राहुल चीनी संविधान लेकर चलते हैं? हमें इसको जांचना होगा”

केंद्रीय मंत्री पंकज चौधरी यांनीही उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर येथील जाहीर सभेत सांगितले की, ”राहुल गांधी संविधान की किताब लेकर दिखा रहे हैं, भारतीय संविधान का कलर नीला होता है और राहुल गांधी जो लाल संविधान दिखा रहे हैं वो लाल संविधान चीन का होता है”.

या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यानंतर हा दावा प्रश्नार्थक स्वरूपात सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला, “क्या राहुल गांधी चीन का संविधान अपने कार्यक्रम में दिखाते हैं”.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: राहुल गांधी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये चीनचे संविधान घेऊन जातात का? येथे जाणून घ्या संपूर्ण सत्य

Fact Check/ Verification

व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी, न्यूजचेकरने तो कार्यक्रम शोधला, ज्याचे चित्र व्हायरल कोलाजमध्ये समाविष्ट होते. दरम्यान, 5 मे रोजी तेलंगणातील नागरकुर्नूल येथे झालेल्या राहुल गांधींच्या सभेत हे दृश्य पाहायला मिळाले. राहुल गांधी यांच्या यूट्यूब अकाउंटवरून हा कार्यक्रम लाईव्ह करण्यात आला होता.

सुमारे 51 मिनिटांच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये 27 मिनिटा नंतरचे दृश्य आम्ही पाहिले. ज्यामध्ये राहुल गांधी हातात एक पुस्तक घेऊन मंचावर भाषण करताना दिसत आहेत. ते यावेळी “गरीब और आम जनता को आजतक जो भी फायदा मिलता है, वह इस किताब की वजह से मिला है. इस किताब से पहले लोगों के लिए हिंदुस्तान में कोई आधिकार नहीं था. लेकिन आज पीएम मोदी और बीजेपी इस किताब को फाड़कर फेंकना चाहते हैं. यह किताब आंबेडकर और गांधी ने दी. यह चुनाव इस किताब को बचाने का चुनाव है”. असे म्हणाले.

Fact Check: राहुल गांधी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये चीनचे संविधान घेऊन जातात का? येथे जाणून घ्या संपूर्ण सत्य
Courtesy: YT/Rahul Gandhi

यावेळी, जेव्हा आम्ही त्या पुस्तकावर झूम इन केले तेव्हा आम्हाला आढळले की त्यावर “THE CONSTITUTION of INDIA” लिहिलेले आहे.

तपासादरम्यान, आम्हाला काँग्रेस पक्षाच्या फेसबुक अकाऊंटवरून अपलोड केलेल्या अनेक चित्रांमध्ये असे दृश्य आढळले. या चित्रांमध्ये असलेल्या पुस्तकाकडे पाहिल्यावर आम्हाला असे आढळले की या लाल आणि काळ्या रंगाच्या पुस्तकाच्या तळाशी इंग्रजीमध्ये EBC लिहिलेले आहे.

Fact Check: राहुल गांधी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये चीनचे संविधान घेऊन जातात का? येथे जाणून घ्या संपूर्ण सत्य
Courtesy: FB/INC

आमचा तपास पुढे नेत, आम्ही संबंधित कीवर्डच्या मदतीने शोधले आणि आम्हाला आढळले की ही EBC प्रकाशनाने जारी केलेली भारतीय संविधानाची कोट पॉकेट आवृत्ती आहे. कोट पॉकेट एडिशन म्हणजे एक पुस्तक जे तुम्ही तुमच्या कोटच्या खिशात ठेवू शकता. तसेच हे पॉकेट बुक मुख्यत्वे गोपाल शंकरनारायण यांनी तयार केल्याचे आम्हाला आढळले.

Fact Check: राहुल गांधी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये चीनचे संविधान घेऊन जातात का? येथे जाणून घ्या संपूर्ण सत्य

याशिवाय, वास्तविक राज्यघटनेचे चित्रही पाहिले आणि त्यात दिसले की मुखपृष्ठावर सोनेरी फुले आहेत आणि मध्यभागी इंग्रजीमध्ये CONSTITUTION OF INDIA लिहिलेले आहे आणि खाली अशोक स्तंभ आहे.

Fact Check: राहुल गांधी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये चीनचे संविधान घेऊन जातात का? येथे जाणून घ्या संपूर्ण सत्य

यानंतर, आम्ही चीनचे संविधान देखील शोधले आणि आढळले की वास्तविक राज्यघटना पूर्णपणे लाल रंगात आहे आणि त्यावर चिनी भाषेत लिहिलेले शब्द आहेत.

Fact Check: राहुल गांधी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये चीनचे संविधान घेऊन जातात का? येथे जाणून घ्या संपूर्ण सत्य

Conclusion

आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की राहुल गांधी स्टेजवर जे पुस्तक दाखवताना दिसत आहेत ते भारतीय राज्यघटनेची पॉकेट बुक एडिशन आहे.

Result: False

Our Souces
Video streamed by Rahul Gandhi YT account on 5th May 2024
Images uploaded by INC FB account
Images uploaded by EBC Website

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular