Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
हिंदूंच्या कोणत्याही धर्मग्रंथावर माझा विश्वास नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
Fact
नाही, व्हायरल दावा खोटा आहे.
हिंदूंच्या कोणत्याही धर्मग्रंथावर माझा विश्वास नाही, असे राहुल गांधी म्हणाले. असे सांगत राहुल गांधींच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांवर विश्वास ठेवण्यास नकार दिल्याचा दावा व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की व्हायरल दावा खोटा आहे. हा व्हिडिओ 8 सप्टेंबर 2023 रोजी सायन्स पो युनिव्हर्सिटी, पॅरिस येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा आहे. यावेळी राहुल गांधी म्हणाले होते की, मी अनेक हिंदू ग्रंथ वाचले आहेत, पण भाजप जे काही करते त्यात हिंदू नाही.
व्हायरल झालेला व्हिडिओ सुमारे 1 मिनिटाचा असून, त्यात राहुल गांधी एका मंचावर भाषण करताना दिसत आहेत. यादरम्यान ते म्हणतात की, “मी अनेक हिंदू धर्मग्रंथ वाचले आहेत, परंतु भाजप जे काही करते ते हिंदू नाही.” पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “कोठे मेले हिंदू नेते आणि काँग्रेसचे मतदार? गीता, भागवत, रामायण, शिव महापुराण अशा कोणत्याही हिंदू धर्मग्रंथावर माझा विश्वास नाही, असे राहुल पप्पू उघडपणे सांगत आहेत.”
व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी न्यूजचेकरने व्हिडिओच्या मुख्य फ्रेमचा रिव्हर्स इमेज शोध केला. यावेळी, आम्हाला काँग्रेस पक्षाच्या अधिकृत X खात्यावरून ट्विट केलेला 1 मिनिट 16 सेकंदाचा व्हिडिओ सापडला, ज्यात व्हायरल झालेल्या व्हिडिओतील दृश्ये आहेत. हा व्हिडिओ ऐकल्यानंतर आणि मजकूरात दिलेली माहिती वाचल्यानंतर आम्हाला आढळले की, सप्टेंबर 2023 मध्ये पॅरिसच्या सायन्स पो युनिव्हर्सिटीमध्ये राहुल गांधींनी विद्यार्थ्यांना संबोधित केले होते.
यादरम्यान राहुल गांधी यांनी इंग्रजीत संबोधित करताना म्हटले होते, ज्याचा मराठी अनुवाद आहे, “मी गीता, उपनिषदे आणि अनेक हिंदू पुस्तके वाचली आहेत. पण भाजप जे काही करतो त्यात हिंदू नाही, अगदी काहीच नाही. मी कधीही कोणत्याही हिंदू पुस्तकात कुठेही वाचले नाही किंवा कोणत्याही विद्वान हिंदू व्यक्तीकडून ऐकले नाही की तुम्ही तुमच्यापेक्षा दुर्बलांना घाबरवा किंवा इजा करा. त्यामुळे ही कल्पना, ही ‘हिंदू राष्ट्रवादी’ ही संज्ञा चुकीची आहे. तो हिंदू राष्ट्रवादी नाही. त्याचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही. त्यांना कोणत्याही किंमतीत सत्ता मिळवायची आहे. सत्ता मिळवण्यासाठी ते काहीही करतील. भारताच्या जातिसंरचनेला आणि सामाजिक रचनेला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी ते काहीही करतील. त्यांना काही लोकांवर वर्चस्व हवे आहे आणि हे त्यांचे ध्येय आहे. त्याच्यात हिंदू काहीच नाही.”
दरम्यान, आम्हाला राहुल गांधींच्या संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ देखील त्यांच्या YouTube खात्यावर सापडला, जो 10 सप्टेंबर 2023 रोजी अपलोड करण्यात आला होता. या अंदाजे 40 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये आम्हाला तो भाग 22 मिनिटांनी मिळाला. वरील भाग पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर आम्हाला आढळले की एका विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने राहुल गांधींना हिंदू राष्ट्रवाद आणि भारतातील वाढत्या कट्टरतावादाबद्दल प्रश्न विचारला होता, ज्याच्या उत्तरात राहुल गांधी यांनी या गोष्टी सांगितल्या होत्या. आम्ही संपूर्ण व्हिडिओ ऐकला असला तरी, आम्ही राहुल गांधी यांनी हिंदू धर्मग्रंथांवर विश्वास नाही असे म्हटल्याचे कुठेही ऐकले नाही.
याशिवाय, आम्हाला 10 सप्टेंबर 2023 रोजी द प्रिंट वेबसाइटवर प्रकाशित केलेला रिपोर्ट देखील सापडला. या वृत्तात असेच सांगण्यात आले आहे की, “राहुल गांधी यांनी पॅरिसमधील सायन्सेस पो युनिव्हर्सिटीमध्ये हिंदू राष्ट्रवादाच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते की, “मी कुठेही हिंदू पुस्तकात वाचले नाही किंवा मी कधीही कोणत्याही विद्वान हिंदू व्यक्तीशी बोललो नाही की तुम्ही असुरक्षित लोकांना घाबरवा आणि इजा केली पाहिजे. ही कल्पना, हिंदू राष्ट्रवादी ही संज्ञा चुकीची आहे. तो हिंदू राष्ट्रवादी नाही. त्याचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही.”
आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की, राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी पॅरिसमधील सायन्सेस पो युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित कार्यक्रमात हिंदूंच्या कोणत्याही धर्मग्रंथावर विश्वास नाही असे म्हटले नव्हते.
Our Sources
Video tweeted by Congress party X account on 10th sep 2023
Video Uploaded by Rahul Gandhi X account on 10th sep 2023
Article Published by The Print on 10th sep 2023
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम रुंजय कुमार यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Runjay Kumar
July 8, 2025
Salman
July 3, 2025
Kushel Madhusoodan
July 2, 2025