Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
राहुल गांधी विवाहित असून आपली विदेशी पत्नी आणि मुलांसमवेत सहलीवर गेले असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.
Fact
हा दावा खोटा आहे. राहुल गांधींसोबत राजस्थानमधील बारन जिल्ह्यातील महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रियंका नंदवाना यांची मुले आहेत. 2022 मध्ये राहुल गांधींनी त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांना हेलिकॉप्टर मधून फिरविले होते.
राहुल गांधी विवाहित असून आपली विदेशी पत्नी आणि मुलांसमवेत सहलीवर गेले असा दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

पोस्टचे संग्रहण येथे पाहता येईल.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

आम्ही या दाव्याच्या तपासात सर्वप्रथम व्हायरल फोटोवर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला तसाच फोटो वापरलेल्या विविध बातम्या सापडल्या मात्र त्यातील मजकूर व्हायरल दाव्याशी सुसंगत नव्हता.
FirstKhaber या यूट्यूब चॅनेलच्या ९ डिसेंबर २०२२ च्या बातमीनुसार, राहुल गांधींसोबत आलेली मुलं राजस्थानच्या बरान जिल्ह्यातील महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रियांका नंदवाना यांची अपत्ये आहेत, असं म्हटलं आहे.

“राहुल गांधी त्यांची आई सोनिया गांधींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बुंदी येथील नैनानी फार्महून सवाई माधोपूरला जात असताना, कामाक्षी नंदवाना यांना त्यांना भेटण्याची इच्छा असल्याचे कळले. हे समजल्यानंतर राहुल गांधी यांनी नंदवाना कुटुंबातील चारही मुलांची भेट घेतली. कामाक्षी तिचा 14 वा वाढदिवस साजरा करत असताना, राहुल गांधींनी तिची भेट घेऊन तिची इच्छा पूर्ण केली आणि त्यांना हेलिकॉप्टरमधून फिरवले.” असे या वृत्तात म्हटले आहे.
समान फोटो प्रदर्शित करणाऱ्या दुसऱ्या रिपोर्टनेही छायाचित्रासंबंधी पूर्वी नमूद केलेल्या तपशीलांची पुष्टी केली. राजस्थान तक चा हा रिपोर्ट सांगतो की राहुल गांधींसोबतच्या व्हायरल फोटोमध्ये चित्रित केलेल्या व्यक्ती त्यांच्याशी नात्याने संबंधित नसून ती काँग्रेस पक्षाच्या राजस्थान युनिटच्या सदस्याची मुले आहेत.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिसणारी लाल टी-शर्ट घातलेली मुलगी मीडियाशी बोलताना दाखवणारा व्हिडिओ रिपोर्ट कनक न्यूज ने १० डिसेंबर २०२२ रोजी प्रसारित केला असून तो इथे पाहता येईल.

नई दुनियाने १० डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील गुडली येथे त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान मध्य प्रदेशातील तीन मुलींना २० मिनिटांच्या हेलिकॉप्टर राईडला नेले होते. भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी उज्जैनमधील तीन मुलींना दिलेले वचन पूर्ण केले.

अशाप्रकारे आमच्या तपासात एका काँग्रेस नेत्याच्या मुलांसोबतचा राहुल गांधींचा फोटो गुप्त लग्नाचा खोटा दावा करून प्रसारित केला जात असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
Our Sources
Video uploaded by FirstKhaber on December 9, 2022
Report published by Rajasthan Tak
Video uploaded by Kanak News on December 10, 2022
News published by Nai Duniya on December 10, 2022
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad S Prabhu
November 29, 2025
JP Tripathi
November 27, 2025
Salman
November 26, 2025