Authors
Claim
व्हिडिओमध्ये एक मुस्लिम महिला श्रीरामाचा अनादर करत पोस्टरवर अंडी फेकताना दिसत आहे.
Fact
छत्रपती संभाजी नगरमध्ये धार्मिक पोस्टर्सची विटंबना करणारी महिला मुस्लिम नसून हिंदू आहे.
काही वृत्तवाहिन्यांसह अनेक सोशल मीडिया युजर्सनी ट्विटरवर एक सीसीटीव्ही फुटेज पोस्ट केले. ज्यात एका मुस्लिम महिलेने श्रीरामाचा अनादर करत त्याच्या पोस्टरवर अंडी फेकल्याचा दावा केला आहे. व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांनी दावा केला आहे की ही घटना महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर, अर्थात पूर्वी औरंगाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात घडली आहे.
व्हिडिओमध्ये महिला गजबजलेल्या रस्त्यावर दुभाजकावर उभी असल्याचे दिसत आहे. स्कूटरवरून जाण्यापूर्वी ती एका बॅनरजवळ उभी राहून काहीतरी करताना दिसते. 20 मे अनेक युजर्सनी ट्विटर आणि फेसबुकवर व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये सुदर्शन न्यूजचाही समावेश आहे.
Fact Check/ Verification
छत्रपती संभाजी नगरच्या श्री राम चौकात ही घटना घडल्याचा दावा व्हायरल व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. याचा सुगावा घेऊन शोध घेतल्यावर आम्हाला गुगल मॅपवर व्हिडिओचे लोकेशन सापडले. व्हिडिओमध्ये महिला ज्या दुभाजकावर उभी आहे ते गुगल स्ट्रीट व्ह्यूवरही पाहता येईल. मॅपमध्ये प्लॅटफॉर्मवर भगवान रामाचा बॅनरही दिसतो.
मराठी मीडिया हाऊस ‘सकाळ’ मध्ये अशाच एका घटनेची बातमी आम्हाला पाहायला मिळाली. व्हायरल व्हिडिओ किंवा त्याचे स्क्रीनशॉट या बातमीत नसले तरी, संभाजी नगर पोलिसांनी एका महिलेला अनेक धार्मिक स्थळांची विटंबना केल्याप्रकरणी अटक केली होती. अशी माहिती आम्हाला त्यात मिळाली.
या बातमीत छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांचा एक व्हिडिओ आहे, ज्यामध्ये त्यांनी माहिती दिली की शहरातील धार्मिक भावना दुखावल्याबद्दल एका महिलेला अटक करण्यात आली आहे. पण ती महिला नैराश्याने ग्रस्त असून ती हिंदू समाजाची आहे, असेही त्यांनी त्यात स्पष्ट केले आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती देणारे एक प्रसिद्धीपत्रकही शेअर करण्यात आले असून आरोपीचे नाव शिल्पा रामराव गरुड असे नमूद करण्यात आले आहे. ती महिला मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे त्यात स्पष्ट केले आहे.
Conclusion
त्यामुळे व्हायरल झालेल्या व्हिडिओचा दावा खोटा आहे आणि तो जातीयवादी वळण देऊन शेअर करण्यात आला आहे, हे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये धार्मिक पोस्टर्सची तोडफोड किंवा विटंबना करणारी महिला मुस्लिम नसून हिंदू आहे.
Result: False
Our Sources
Report of Sakal, posted on May 21, 2023
Tweet of police commissioner of Chhatrapati Sambhajinagar
Self Analysis
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in