Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckReligionगोळीबाराचा व्हायरल व्हिडिओ नुकत्याच कानपूरमध्ये झालेल्या हिंसेचा आहे? जाणून घ्या याचे सत्य...

गोळीबाराचा व्हायरल व्हिडिओ नुकत्याच कानपूरमध्ये झालेल्या हिंसेचा आहे? जाणून घ्या याचे सत्य काय आहे

(याची तथ्य पडताळणी न्यूजचेकर हिंदीने केली असून हा लेख Shubham Singh यांनी लिहिलेला आहे)

सोशल मीडियावर गोळीबाराचा व्हायरल व्हिडिओ शेअर करत त्यात दावा केला जातोय की, कानपूरमध्ये काही धर्माचे विशिष्ट लोक पोलिसांवर शस्त्राने गोळीबार करत आहे. व्हिडिओत काही लोकांच्या हातात शस्त्रे दिसत आहे. काही युजर हा व्हिडिओ नुकत्याच कानपूरमध्ये झालेल्या हिंसेचा सांगत आहे. त्यातच काही अन्य सोशल मीडियावरील युजर हा व्हिडिओ प्रयागराज सांगत शेअर करत आहे.

फोटो साभार : Facebook/बुलडोजर बाबा सनातनी

ट्विटरवर देखील काही युजर हा व्हिडिओ नुकत्याच कानपूरमध्ये झालेल्या हिंसेशी जोडत शेअर करत आहे.

(या ट्विटची संग्रहित केलेली दुवा इथे वाचू शकता)

भाजपाच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. त्यानंतर काही दिवसांनी भारतातील विविध राज्यात हिंसा आणि दगडफेकीच्या घटना समोर आल्या. जून महिन्याच्या सुरवातीला युपीतील कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर दुकान बंद करण्यावरून दोन गट समोरासमोर आले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आणि काही गोळ्यांच्या फैरीही झाडल्या. 

मागच्या आठवड्यात युपीतील प्रयागराज आणि झारखंडच्या रांचीमध्ये दगडफेकीच्या काही घटना समोर आल्या. बीबीसीच्या बातमीनुसार, युपी पोलिसांनी मागच्या शुक्रवारी झालेल्या हिंसेनंतर आतापर्यंत आठ जिल्ह्यातील ३०४ लोकांना अटक केली आहे. त्यातच आता सोशल मीडियावर गोळीबाराचा व्हायरल व्हिडिओ शेअर करत त्यात दावा केला जातोय की, कानपूरमध्ये काही धर्माचे विशिष्ट लोक पोलिसांवर शस्त्राने गोळीबार करत आहे. याची तथ्य पडताळणी आधी न्यूजचेकर हिंदीने केली आहे.

Fact Check / Verification

गोळीबाराचा व्हायरल व्हिडिओ आम्ही इन-वीड टूलच्या मदतीने रिव्हर्स सर्च करून शोधला. तेव्हा आम्हांला हा व्हिडिओ ऑल राईट्स मॅगझीन नावाच्या यु ट्यूब वाहिनीवर मिळाला. ९ मे २०२१ रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओच्या शीर्षकानुसार,”बरेलीच्या भोजीपुरा पोलीस ठाण्याच्या धौरा टांडामध्ये गाय तस्करांनी अवैध शस्त्रे उगारून गोळीबार केला. त्यानंतर त्या परिसरात चेंगराचेंगरी झाली.” यावरून हे स्पष्ट होते की, व्हायरल क्लिप इंटरनेटवर एक वर्षापासून उपलब्ध आहे. 

त्यानंतर आम्ही काही कीवर्ड गुगलवर टाकले. त्यावेळी आम्हांला दैनिक भास्करने एक वर्षांपूर्वी प्रकाशित केलेली एक व्हिडिओ मिळाली. त्या बातमीनुसार,”युपीतील बरेलीच्या टांडा गावांत बंदी घातलेल्या प्राण्यांचे मांस विकण्यासाठी दुकानदार आणि भाडेकरू समोरासमोर आले. यावरून एकाच समाजातील दोन गटांमध्ये हाणामारी झाली.” या दरम्यान तिथे गोळीबारही झाला. 

फोटो साभार : Dainik Bhaskar

न्यूजचेकरने या दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी बरेलीच्या भोजीपुरा ठाण्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हांला सांगितले,”हा व्हिडिओ जवळपास एक वर्षांपूर्वीचा आहे. यामुळे एकाच समाजातील दोन गटांमध्ये वाद झाले. याप्रकरणी आरोपींवर कारवाई करून त्यांना कारागृहात पाठवण्यात आले.”

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, गोळीबाराचा व्हायरल व्हिडिओ नुकत्याच कानपूरमध्ये झालेल्या हिंसेच्या संबंधित नाही. हा व्हिडिओ बरेलीचा असून तो एक वर्षांपूर्वीचा आहे.

Result : False Context/False

Our Sources

९ मे २०२१ रोजी ऑल राईट्स मॅगझीनने अपलोड केलेला यु ट्यूब व्हिडिओ

मे २०२१ रोजी दैनिक भास्करने प्रकाशित केलेली बातमी

फोनवरून १५ जून २०२२ रोजी बरेलीच्या भोजीपुरा पोलीस ठाण्याशी झालेला संवाद

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular