Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सोशल मीडियावर बिहारच्या ऋतुराज नावाच्या मुलाचे खूप कौतुक होत आहे. बिहारच्या ऋतुराज चौधरीने 51 सेकंद गुगल हॅक केले, त्याचे हे काम गुगलला इतके आवडले की ऋतुराजला नोकरीची ऑफर दिली गेली आहे असा दावा व्हायरल झाला आहे.
फेसबुक पोस्ट इथे पहा.
फेसबुक पोस्ट इथे पहा
जेव्हा न्यूजचेकरने ‘बिहार बॉय ऋतुराज गुगल’ आणि ‘ ऋतुराज हॅक गुगल’ सारख्या कीवर्डच्या मदतीने Google वर शोध घेतला तेव्हा अनेक मीडिया रिपोर्ट्स समोर आले. 3 फेब्रुवारी 2022 रोजी टाईम्स Times Of India मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्रटनुसार, एका स्थानिक मुलाने Google मध्ये संभाव्य बग शोधल्याचा दावा केला आहे, ज्यावर हॅकर्सनी यशस्वीरित्या हल्ला केला असावा आणि त्याची सुरक्षा निश्चित करणे आवश्यक आहे असे शोध इंजिनला वाटते.
अहवालात पुढे असे लिहिले आहे की, IIIT मणिपूरमध्ये शिकणारा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी ऋतुराज चौधरी म्हणतो की बग शोधण्याच्या आवडीमुळे त्याने हा संभाव्य बग शोधला आणि कंपनीला कळवले, धोका मान्य करून कंपनीने ऋतुराजला . संशोधकांच्या यादीत स्थान दिले.
ऋतुराज चौधरी याच्या प्रोफाईलला गुगलच्या बग हंटर्सकडून टायगर अवॉर्ड देण्यात आला आहे. दैनिक भास्करमध्ये प्रसिद्ध झालेल्या आणखी एका वृत्तात असेही सांगण्यात आले आहे की, ऋतुराज चौधरी यांनी गुगलवर बग शोधून कंपनीला माहिती दिली आहे.
या मीडिया रिपोर्ट्समध्ये कुठेही गुगल 51 सेकंदांसाठी हॅक केल्याचा उल्लेख नाही किंवा कंपनीने ऋतुराजला नोकरीची ऑफर दिल्याचीही माहिती नाही.
आमच्या तपासात पुढे, आम्ही Google बग हंटर्स समुदायावरील कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ऋतुराज चौधरीबद्दल माहिती शोधू लागलो. येथे उपस्थित असलेल्या ऋतुराज चौधरीच्या प्रोफाइलवरून, आम्हाला कळले की तो जानेवारी 2022 पासून बग हंटर्स समुदायाचा सदस्य आहे आणि 25 जानेवारी रोजी त्याने पहिला अहवाल सादर केला होता आणि त्याच दिवशी त्याला ‘टायगर अवॉर्ड’ देण्यात आले.
न्यूजचेकरला Google बग हंटर्स समुदायावरील ऋतुराजच्या प्रोफाइलवरून त्याचे लिंक्डइन प्रोफाइल देखील सापडले.
त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये, ऋतुराज स्वतःला सायबर सिक्युरिटी एंथोजिअस्ट, बग हंटर आणि कोडर म्हणून वर्णन करतो. तो आयआयआयटी मणिपूर येथे काॅम्प्युटर सायंसचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे.
बिहारच्या ऋतुराज चौधरीने 51 सेकंद गुगल हॅक केले?
आम्हाला Linkedin ऋतुराज चौधरीची एक पोस्ट देखील सापडली जिथे त्याने 51 सेकंदांसाठी Google हॅक केल्याचे त्यानंतर कंपनीने त्याला नोकरीची ऑफर पाठवली असल्याचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. या पोस्टमध्ये तो लिहितो, “मला गुगल हॅक करण्यासाठी कोणतेही पॅकेज किंवा नोकरीची ऑफर मिळालेली नाही. मी नोंदवलेला तो फक्त एक बग होता. सध्या मी फक्त B.Tech द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. तर… या बातम्या खोट्या आहेत…”
ऋतुराजने Google ने पाठवलेल्या ईमेलचा स्क्रीनशॉटही पोस्ट केला आहे.
अनेक व्हायरल सोशल मीडिया पोस्ट्स आणि डीएनएसह अनेक मीडिया पोर्टल्सने ऋतुराजचे वर्णन आयआयटी मणिपूरचा विद्यार्थी म्हणून केले आहे पण तो आयआयआयटी मणिपूरमधून काॅम्प्युटर सायंस शिकत आहे.
बिहारच्या मुलाने गुगल हॅक केल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा आहे. बिहारच्या ऋतुराजने कंपनीला फक्त एक बगबद्दल सांगितले होते.
Read More: लता मंगेशकरांचे अंत्यदर्शन घेताना शाहरुख खान थुंकला? हे आहे व्हायरल दाव्याचे सत्य
LinkedIn Account of Rituraj Chaudhary
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा