Authors
Claim
माझ्या मुस्लिम बांधवांसाठी दुःखाचा दिवस असे उद्धव ठाकरे म्हणत असल्याचे सांगणारे सकाळचे न्यूजकार्ड.
Fact
हा दावा खोटा असून संबंधित न्यूजकार्ड खोटे असल्याचे सकाळ माध्यमाने स्पष्ट केले आहे.
‘सकाळ’ माध्यमाचा लोगो वापरून आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो असलेले एक न्यूजकार्ड सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. याद्वारे शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या नावे एक विधान पसरविले जात आहे.
आम्हाला Facebook आणि X या माध्यमांवर हा दावा आढळून आला.
दाव्यांचे संग्रहण येथे आणि येथे पाहता येईल.
“आज माझ्या मुस्लिम बांधवांसाठी दुःखाचा दिवस आहे! बाबर हा देशासाठी शहीद झाला.” असे विधान उद्धव ठाकरे यांनी केल्याचे हे न्यूजकार्ड सांगते. शिवाय “ही औलाद नक्की बाळासाहेबांचीच आहे की नाही हा प्रश्न नेहमी पडतो एवढा कसा हिरवा झालाय हा Uddhav Thackeray” असा प्रश्नही विचारते.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Fact Check/ Verification
सर्वप्रथम दाव्याची सत्यता तपासण्यासाठी आम्ही व्हायरल न्यूजकार्डमधील उद्धव ठाकरे यांची असे सांगून शेयर केली जात असलेली विधाने Google वर शोधली. मात्र उद्धव ठाकरे असे म्हणाल्याचे सांगणारी कोणत्याही अधिकृत मीडियाने दिलेली बातमी आमच्या पाहणीत आली नाही. उद्धव ठाकरे यांनी असे विधान केले असते तर नक्कीच त्याची मोठी बातमी झाली असती, मात्र तसे काहीच न आढळल्याने आम्हाला संशय आला.
ज्या सकाळ माध्यमाचा लोगो वापरून हे न्यूजकार्ड बनविण्यात आले आहे त्या माध्यमाच्या अधिकृत वेबसाईट, फेसबुक पेज आणि X खात्यावर आम्ही शोधून पाहिले मात्र आम्हाला अशी बातमी मिळाली नाही.
दरम्यान सकाळ ने आपल्या फेसबुक पेज आणि X खात्यावरून दाव्याचे खंडन करणाऱ्या पोस्ट ८ डिसेंबर २०२४ रोजी पोस्ट केल्या असल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.
“उद्धव ठाकरेंची ही बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेली नाही. कोणीतरी मुद्दाम खोडसाळपणा करून खोटी माहिती पसरवत आहे. सकाळचा लोगो वापरून ही चुकीची बातमी प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कृपया अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका.” असे सकाळ ने आपल्या पोस्टमध्ये म्हटलेले आहे.
शिवसेना UBT पक्षाने सुद्धा सकाळ ची ही पोस्ट आपल्या अधिकृत X खात्यावर शेयर करीत संबंधित दाव्याचे खंडनच केले आहे. “पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या ‘फेक’ विधानाचा सकाळ वृत्तपत्राने केला पर्दाफाश! क्रेडिट:@SakalMediaNews” अशी कॅप्शन या पोस्टला देण्यात आले आहे.
यावरून उद्धव ठाकरे यांचे विधान असे सांगत व्हायरल असलेले न्यूजकार्ड खोटे असल्याचे स्पष्ट होते.
Conclusion
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात माझ्या मुस्लिम बांधवांसाठी दुःखाचा दिवस असे उद्धव ठाकरे म्हणत असल्याचे सांगणारे सकाळचे न्यूजकार्ड खोटे असल्याचे आणि सकाळ माध्यमानेही त्याचे खंडन केले असल्याचे स्पष्ट झाले.
Result: False
Our Sources
Google Search
Social Media Accounts of Sakal Media Group
Facebook post shared by Sakal on December 8, 2024
Tweet made by Sakal Media on December 8, 2024
Tweet Made by Shivsena UBT Communication on December 8, 2024
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा