Wednesday, December 25, 2024
Wednesday, December 25, 2024

HomeFact CheckPoliticsराष्ट्रपती पदासाठी काँग्रेसच्या उमेदवारालाच पाठिंबा द्यायचा, असं विधान खरंच संजय राऊत यांनी...

राष्ट्रपती पदासाठी काँग्रेसच्या उमेदवारालाच पाठिंबा द्यायचा, असं विधान खरंच संजय राऊत यांनी केलंय? भ्रामक दावा व्हायरल

सोशल मीडियावर लोकसत्ताचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटोद्वारे दावा केलाय की,”राष्ट्रपती युपीएचाच होणार. शिवसेनेचे खासदार काही म्हणू देत, त्याला मी महत्त्व देत नाही. मी म्हणतो ना राष्ट्रपती पदासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठींबा द्यायचा. मी पवार साहेबांना शब्द दिला आहे.” असे विधान शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी केले आहे.

आप्पासाहेब बाबासाहेब पारधे या फेसबुक युजरने १२ जुलै २०२२ व्हायरल फोटो पोस्ट करत त्यात लिहिले,”इतक्या शिथिल भुमिका असेल तर कशी ताठर होणार उद्धवसाहेबांची सेना.” हा फोटो फेसबुकवर शेअर केला जात आहे.

फोटो साभार : Facebook/आप्पासाहेब बाबासाहेब पारधे
फोटो साभार : Facebook/Nachiket Pawanekar

ट्विटरवर देखील हा फोटो शेअर केला जात आहे.

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता.

भारतात राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार आहे. यासाठी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार आहेत तर विरोधी पक्षांच्या आघाडीने यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्यातच आता लोकसत्ताच्या फोटोद्वारे दावा केलाय की,”राष्ट्रपती युपीएचाच होणार. शिवसेनेचे खासदार काही म्हणू देत, त्याला मी महत्त्व देत नाही. मी म्हणतो ना राष्ट्रपती पदासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठींबा द्यायचा. मी पवार साहेबांना शब्द दिला आहे.” 

Fact Check / Verification

शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी हे विधान खरंच केलंय, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही लोकसत्ताचे अधिकृत फेसबुक पान तपासले. त्यावेळी आम्हांला व्हायरल फोटोशी अगदी मिळता-जुळता एक फोटो मिळाला.

फोटो साभार : Facebook/Loksatta

त्यानंतर आम्ही लोकसत्ताच्या अधिकृत फेसबुक पानावर मिळालेला फोटो आणि व्हायरल झालेला फोटो अशा दोन्ही फोटोंची तुलना केली. बॅकग्राऊंडचा फोटो, लोकसत्ता डॉट कॉम आणि विधान वगळता सर्व गोष्टी सारख्याच असल्याचे समजले. याचबरोबर दोन्ही विधानाचा फॉन्ट वेगळा असल्याचे समजले.

फोटो साभार : Facebook/Loksatta, Facebook/page/फालतुगिरी

या विधानासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही “राष्ट्रपती युपीएचाच होणार. शिवसेनेचे खासदार काही म्हणू देत, त्याला मी महत्त्व देत नाही. मी म्हणतो ना राष्ट्रपती पदासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठींबा द्यायचा. मी पवार साहेबांना शब्द दिला आहे.” यातील काही शब्द गुगलवर टाकून शोधले. तेव्हा आम्हांला १० जुलै २०२२ रोजीची लोकसत्ताची बातमी मिळाली. त्या बातमीनुसार, बंडखोर गटाचे मुखवटे आपोआप गळून पडत असून पूर्वाश्रमीचे शिवसैनिक एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत, असे टीकास्त्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोडले. आम्हांला बातमीतील आणि मूळ फोटोचा मजकूर एकच असल्याचे आढळले.

फोटो साभार : Loksatta

या संदर्भात न्यूजचेकरने अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लोकसत्ताशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी देखील हेच सांगितले की, व्हायरल फोटो एडिट केलेला आहे. त्याचबरोबर आम्ही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण आमचा संपर्क होऊ शकला नाही. जर आमचा संपर्क झाला तर लेख अपडेट करू. 

हे देखील वाचू शकता : वेळ पडल्यावर शिवसेना पुढील सर्व निवडणूका राष्ट्रवादीच्या घड्याळ निशाणीवर लढवणार, हे विधान खरंच संजय राऊत यांनी केलंय? याचे सत्य जाणून घ्या

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, लोकसत्ताच्या नावाने शेअर केल्या जाणाऱ्या फोटोतील संजय राऊत यांचे विधान एडिट केले आहे. शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी हे विधान केलेले नाही. 

Result : Altered Photo/Video

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular