Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
कर्नाटकात मंदिरातील पुजा-यांनी दानपेटीतील रक्कम काढण्यास सरकारी कर्मचा-यांना विरोध केला असल्याच्या दाव्याने एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. एका मंदिरात काही लोक आणि पुजा-यांमध्ये बाचबाची झालेली दिसते. तसेच यातील पुजारी दानपेटी ढकलणा-या लोकांना कन्नड भाषेत ओरडताना दिसत आहेत.
पोस्टमध्ये म्हटलेआहे की, “कर्नाटक सरकारचे अभिनंदन म्हणून बंधूंनो काल्पनिक देवाच्या दानपेटीत बिलकुल दान टाकू नका हॉस्पिटलसाठी शाळेसाठी तसेच गरीब लोकांना मदत करा परंतु त्या फुकट खावू पंडितांना दान देवू नका”.
आमच्या एका वाचकाने हा व्हिडिओ आम्हाला व्हाट्सअॅपवर पडताळणीसाठी पाठविलेला आहे. आम्ही याबाबत अधिक शोध घेतला असता हा व्हिडिओ आम्हाला फेसबुकवर देखील याच दाव्याने शेअर होत असल्याचे आढळून आले.

कर्नाटकातील मंदिरातील पुजा-यांनी दानपेटील पैसे काढणा-या सरकारी कर्मचा-यांना खरंत विरोध केला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला हा व्हिडिओ आणखी एका दाव्याने शेअर होत असल्याचे आढळून आले. मात्र हा दावा वेगळा आहे. यात म्हटले आहे की, कर्नाटकातील मंदिरातील पुजा-यांनी दानपेट्या हटवण्यास सुरवात केली हे कारण त्यांचे म्हणणे हे की हा दानपेट्यांतील पैसा हिंदुंच्य उपयोगी येत नसेल तर या दानपेट्या मंदिरात काय कामाच्या आहेत?
व्हायरल दावे परस्परविरोधी असल्याने आम्ही व्हायरल व्हिडिओ विषयी अधिक शोध घेण्यास सुरवात केली.असता आम्हाला एका फेसबुक पेजवर हा व्हिडिओ 2015 मधील असल्याचा व कर्नाटकातील कोलारम्मा मंदिरातील असल्याचा उल्लेख केल्याचे आढळून आले.
याशोधादरम्यान एका यूजरने प्रजावाणी या कन्नड वेबसाईटवरचा लेख शेअर केल्याचे आढळून आले. याचा आम्ही अनिवाद केला. यात म्हटले आहे की, “पुरोहितांनी शुक्रवारी लोकप्रिय मंदिरात पूजा सेवा बंद केली. हायकोर्टाच्या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.के.व्ही. त्रिलोकचंद्र व मुझराई विभागाचे अधिकारी दुपारी मंदिरात पोहोचले. त्यावेळी मंदिरात उपस्थित पुरोहितांबरोबर त्यांचा वाद झाला. “

प्रजवाणीच्या अहवालात म्हटले आहे की 8 वर्षांपूर्वी कोलारमा मंदिरात देणगीसाठी दानपेटी पुजार्यांनी काढून टाकली. देणग्यांवर राज्य सरकार कर लादते. दानपेटी हटविण्याबाबत पुजार्यांनी कोर्टात खटला दाखल केला होता. परंतु त्यांचा निकाल त्यांच्या बाजून लागला नाही आणि जिल्हाधिका-यांनी देणगी बॉक्स पुन्हा मंदिरात ठेवले. दानपेटी ठेवण्यासाठी अधिकारी आल्यावर मंदिराच्या पुजार्यांशी त्यांचा वाद झाला. प्रजावाणीच्या अहवालानुसार, मंदिराच्या एका पुजार्याच्या हवाल्याने सांगितले गेले आहे की मंदिरात एकूण 8 पुजारी आहेत, जे पूर्णपणे मंदिरावर अवलंबून आहेत. देणगी बॉक्स मंदिरात ठेवल्यास ते त्यांची उपजीविका कशी करतील शिवाय आपल्या मुलांचे संगोपन कसे करतील? हा प्रश्न त्यांना सतावत आहेत म्हणूनच त्यांनी दानपेटी मंदिरात ठेवण्यास विरोध केला आहे.
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, कर्नाटकातील मंदिरांमध्ये दान पेटी हटविण्याची किंवा त्यातून पैसे काढण्यास विरोध करण्याची मोहितम पुजा-यांनी सध्या सुरु केलेली नाही. जुना व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल झाला आहे.
Read More : देशी दारुच्या काढ्याने कोरोना रुग्ण बरे होत असल्याचा डाॅक्टरचा दावा, जाणून घ्या सत्य
| Claim Review: कर्नाटकात पुजा-यांनी सरकारी कर्मचा-यांना दानपेटीतील पैसे काढण्यास विरोध केला. Claimed By: Social Media post Fact Check: Misleading |
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
July 27, 2024
Vasudha Beri
July 3, 2024
Ishwarachandra B G
June 27, 2024