Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सोशल मीडियात सध्या एका पुल पडून त्या खाली अनेक गाड्या दबल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, दावा करण्यात येत आहे की हा व्हिडिओ हैद्राबादमधील मेेट्रो पुलाचा आहे. तसेच दुसरा दावा असाही करण्यात येत आहे की हैद्राबादमधील बालानगर भागातील हा फ्लायओव्हर असून यात अनेक गाड्या दाबल्या गेल्या आहेत. ट्रॅफिक जाम झाल्याने या भागातून प्रवास टाळण्याचे आवाहन ही काही व्हायरल पोस्टमधून करण्यात येत आहे.
आमच्या एका वाचकाने हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची पडताळणी करण्याची तो आम्हाला पाठवला. याशिवाय ट्विटरवर देखील हा व्हिडिओ आम्हाला याच दाव्याने आढळून आला.
काही किवर्डसच्या साहाय्याने आम्ही गूगलमध्ये शोध घेतला पण आम्हाला कुठेही हैद्राबादमधील मेट्रो पुल कोसळल्याची बातमी आढळून आली नाही. यानंत आम्ही व्हायरल व्हिडिओतील स्क्रीनशाॅट्स काढले आणि Google Reverse Image च्या साहाय्याने शोध घेण्यास सुरुवात केली.
आम्हाला 2018 मधील एक व्हिडिओ VOA News या युट्यूब चॅनलवर आढळून आला ज्यात व्हायरल व्हिडिओतील दृश्यांची मिळती जुळती दृश्ये होती.
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार 2018 मध्ये वाराणसीत निर्माणाधीन उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला होता असे म्हटले आहे.
आम्ही या संदर्भात काही कीवर्ड्स वापरुन गूगलमध्ये शोध घेतला असता वाराणसीच्या दुर्घटनेच्या अनेक बातम्या आम्हाला आढळून आल्या. याशिवाय मध्ये अशाच घटनेचे कित्येक बातमीदार अहवाल आढळले. तसेच Asian News International (ANI) या वृत्तसंस्थेचे ट्विट देखील आढळून आले. यात वाराणसीच्या कॅन्टोन्मेंटमधील निर्माणाधीन उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्याच्या ठिकाणावरील दृश्ये आहेत व्हायरल व्हिडिओमधील दृश्ये देखील सारखीच आहेत हे या ट्विटवरुन लक्षात येेते.
याशिवाय आम्हाला व्हायरल व्हिडिओ विषयी देखील तेलगंणा पोलिसांचे ट्विट आढळून आले. यात म्हटले आहे की, व्हायरल व्हिडिओ बालनगर-हैदराबादचा नाही. हा वाराणसीचा दोन वर्षांचा व्हिडिओ आहे. DD News ने याची बातमीदेखील दाखवली होती.
यावरुन हे स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ दोन वर्षापूर्वा वाराणसीमध्ये कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाचा आहे, हैद्राबादमधील मेट्रो पुलाचा किंवा उड्डाणपुलाचा नाही.
VOA News- https://www.youtube.com/watch?v=I3KKCXg0H5s
ANI- https://twitter.com/ANINewsUP/status/996384562862211072
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
April 17, 2025
Prasad S Prabhu
June 20, 2024
Runjay Kumar
October 6, 2023