टिव्ही 9 मराठी न्यूज चॅनलच्या बातमीचा एक स्क्रीनशाॅट व्हायरल झाला आहे. यात कोरोनाला देवेंद्र फडणवीसांची लागण असे लिहिल्याचे आढळते. दावा करण्यात येत आहे की, ब्रेकिंग न्यूजच्या नादात ही हेडिंग टिव्ही 9 च्या पडद्यावर दिसली होती. हा स्क्रीनशाॅट व्हायरल झाल्यांनंतर सोशल मीडियात देखील वेगवेगळया प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

Fact Check/Verification
माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी माध्यमांत प्रसिद्ध झाली असताना टिव्ही 9 कोरोनाला देवेंद्र फडणवीसांची लागण अशी घाईगडबड़ीत बातमी दिली का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. या संदर्भात तपास सुरु केला. टिव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवला भेट दिली असता आम्हाला याबाबत बातमी आढळून आली. ज्यात टिव्ही 9 च्या बातम्याचे स्क्रीनशाॅट्स एडिट करुन खोडसाळपणा केला जात असल्याचे म्हटले आहे. याबाबत सायबर सेलकडे तक्रार केली असल्याचे म्हटले आहे.

याबाबत टिव्ही 9 मराठीने ट्विटरवर देखील याबाबत माहिती दिली आहे.
याशिवाय आम्हाला यूट्यबवर देखील बातमी आढळून आली. यात बातमीमध्ये शब्द बदल करुन बातम्या व्हायरल केल्या प्रकरणी सायबर सेल कडे तक्रार करण्यात आल्याचे म्हटले आहे.
Conclusion
यावरुन हेच सिद्ध होते की टिव्ही 9 मराठीच्या बातमीत बदल करुन चुकीचा स्क्रीनशाॅट व्हायरल करण्यात आला आहे. याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.
Result: False
Our Source
टिव्ही 9 मराठी- https://www.tv9marathi.com/maharashtra/tv9-marathi-complaint-cyber-cell-against-who-morf-and-spread-wrong-image-295930.html
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.