Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात आता हिरवे शिवबंधन बांधून अल्पसंख्याकांना प्रवेश दिला जात आहे.
Fact
भगवे शिवबंधन बांधतानाचा फोटो एडिट करून दिशाभूल करणारा दावा करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे हिरवे बंधन बांधून अल्पसंख्याकांना प्रवेश देऊ लागले, असे सांगणारा दावा सध्या एका फोटोच्या माध्यमातून केला जात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात आता हिरवे शिवबंधन बांधून अल्पसंख्याकांना प्रवेश दिला जात आहे. असे हा दावा सांगतो.
पोस्टचे संग्रहण येथे पाहता येईल.
“आता हिरवे जनाबबंधन बांधून अल्पसंख्यांकांचा प्रवेश ! अश्याच लोकांना प्रवेश करता यावा म्हणून उबाठा उरण हत्याकांडावर गप्प आहेत” असे व्हायरल इमेजवर लिहिण्यात आले आहे. तसेच दाव्यासोबत “वाह जनाब उबाठा वाह ! क्या रंग बदल दिये आपने! #MuslimHrudaySamrat #SSUBT #FashivSena” असे कॅप्शन लिहिण्यात आले आहे.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
न्यूजचेकर ने व्हायरल पोस्ट काळजीपूर्वक पाहिली. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एका व्यक्तीस हिरवा धागा बांधत असल्याचे दाखविण्यात आले आहे. शिवसेनेत कुणाचाही प्रवेश केला जात असताना त्याला भगवे शिवबंधन बांधण्याची पद्धत आहे. यावरून आम्हाला या पोस्टचा संशय आला. आम्ही सदर पोस्ट करणारे फेसबुक पेज Fashiv Sena काळजीपूर्वक पाहिले. यावर आम्हाला महाविकास आघाडीत सहभागी पक्षातील नेत्यांवर आधारित अशाच अनेक पोस्ट पाहायला मिळाल्या.
आम्ही या पेजच्या बायोमध्ये डोकावून पाहिले असता, “फशिवसेना हे MVA ला उघड करण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिकांच्या सहभागाचे व्यासपीठ आहे. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील आमचे अनुसरण करा.” अशी माहिती मिळाली.
पुढील तपासात आम्ही व्हायरल चित्रावर रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला. आम्हाला @ShivSenaUBT_ या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अधिकृत X खात्यावरून ३० जुलै २०२४ रोजी केलेले एक ट्विट सापडले. यामध्ये व्हायरल चित्र आहे, मात्र त्यामध्ये उद्धव ठाकरे संबंधित व्यक्तीला आपल्या पक्षाच्या प्रथेप्रमाणे भगवे शिवबंधन बांधत असल्याचे आढळले.
“महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष हाजी असगर शेख ह्यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले.” अशी कॅप्शन आम्हाला वाचायला मिळाली.
आम्ही @ShivSenaUBT_ ने ट्विट केलेला फोटो झूम करून क्रॉप करून पाहिला असता, त्यात शिवबंधन म्हणून बांधले जात असलेला धागा भगवाच असल्याचे दिसून आले.
आम्ही व्हायरल फोटो आणि ओरिजिनल फोटो यांच्यात तुलना केली असता व्हायरल चित्रात भगवा धागा एडिट तंत्राचा वापर करून हिरवा करण्यात आला असल्याचे दिसून आले. संबंधित फोटोंचे तुलनात्मक परीक्षण आपण खाली पाहू शकता.
यावरून हा दावा एडिटेड फोटोच्या आधारे करण्यात आला असल्याचे स्पष्ट होते.
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात आता हिरवे शिवबंधन बांधून अल्पसंख्याकांना प्रवेश दिला जात आहे, हा दावा खोटा आहे. भगवे शिवबंधन बांधतानाचा फोटो एडिट करून दिशाभूल करणारा दावा करण्यात आला आहे. हे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Self analysis
Tweet published by @ShivSenaUBT_ on July 30, 2024
Google Search
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Runjay Kumar
July 15, 2025
Runjay Kumar
July 14, 2025
Salman
July 3, 2025