Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
हरियाणातील मेवात येथील काँग्रेसच्या निवडणूक रॅलीचा व्हिडिओ.
Fact
हा दावा खोटा आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील लातूरमध्ये ईद-ए-मिलादच्या वेळी काढण्यात आलेल्या बाइक रॅलीचा आहे.
हरियाणातील विधानसभा निवडणुकीसाठी 5 ऑक्टोबर 2024 रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, हरियाणात काँग्रेसच्या निवडणूक प्रचारादरम्यानच्या बाईक चालवणाऱ्या लोकांच्या मिरवणुकीचा व्हिडिओ असे सांगत सोशल मीडियावर एक दावा व्हायरल होत आहे. 5 मिनिटे 23 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये बाईक चालवणारे लोक रॅली काढताना दिसत आहेत. व्हिडिओसोबत असा दावा केला जात आहे की, हरियाणात काँग्रेसच्या निवडणूक प्रचार रॅलीमध्ये फक्त इस्लामिक झेंडे दिसले होते.
28 सप्टेंबर 2024 रोजी केलेल्या X पोस्ट (संग्रहण) मध्ये व्हायरल व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ही मिरवणूक कोणत्याही इस्लामिक देशाची नसून हरियाणाच्या मुस्लिम भागातील मेवात येथील काँग्रेसची निवडणूक प्रचार मिरवणूक आहे. या मिरवणुकीत तुम्हाला कलमा लिहिलेला सौदी अरेबियाचा ध्वज, पॅलेस्टाईनचा ध्वज आणि खिलाफतचा इस्लामी ध्वज दिसेल. परंतु काँग्रेस पक्षाच्या मिरवणुकीत तुम्हाला हिंदू, शीख किंवा जैन किंवा पारसी धर्माचा कोणताही ध्वज दिसणार नाही” या दाव्यासह व्हायरल होत असलेल्या फेसबुक पोस्ट येथे, येथे आणि येथे पाहता येतील.
हरियाणाच्या मेवातमध्ये काँग्रेसच्या रॅलीचा असे सांगत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेसचा एकही झेंडा दिसत नाही. अशा परिस्थितीत आम्ही संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला. या वेळी आम्हाला असे आढळून आले की व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या पोलिसांच्या वाहनावर महाराष्ट्र पोलिसांचे चिन्ह आहे. तसेच पोलिसांच्या दुचाकीवर मराठीत ‘पोलीस’ असे लिहिलेले दिसत आहे.
व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मोटरसायकलवर MH 24 लिहिलेले दिसत आहे. MH 24 हा महाराष्ट्रातील लातूरचा वाहन नोंदणी क्रमांक असल्याची माहिती आहे.
व्हिडिओच्या मागील बाजूस दिसणारे होर्डिंग ‘लातूर अतिदक्षता हॉस्पिटल’ असे वाचले जाऊ शकते. Google कीवर्ड शोधल्यावर, आम्हाला आढळले की हे हॉस्पिटल गांधी चौक, नांदेड रोड, लातूर, महाराष्ट्र येथे आहे. आता आम्ही गुगल मॅपच्या मदतीने हा पत्ता शोधला आणि व्हायरल क्लिपमध्ये दिसणाऱ्या लोकेशनशी स्ट्रीट व्ह्यूद्वारे आजूबाजूचा परिसर जुळवला. जुळल्यानंतर, व्हायरल क्लिपमध्ये दिसणारे ठिकाण लातूरमधील गांधी चौक असल्याचे निश्चित झाले.
या मिरवणुकीच्या अधिक माहितीसाठी आम्ही लातूरचे स्थानिक पत्रकार अश्फाक पठाण यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितले की, “हा व्हिडिओ महाराष्ट्रातील लातूर येथे ईद-ए-मिलादच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीचा आहे. दरवर्षी ईद-ए-मिलादच्या निमित्ताने ही मिरवणूक काढण्यात येते, असे त्यांनी सांगितले. ही मिरवणूक लातूरच्या सुफिया मशिदीपासून सुरू होऊन शाहू चौकातून जाते.” हे उल्लेखनीय आहे की ईद-ए-मिलाद प्रेषित मोहम्मद यांची जयंती आणि पुण्यतिथीचे प्रतीक आहे. यावर्षी ईद-ए-मिलाद 15 सप्टेंबरच्या सायंकाळपासून ते 16 सप्टेंबर 2024 पर्यंत होती.
पुढील तपासात लातूरचे पोलीस अधीक्षक प्रेमप्रकाश मारोतराव माकोडे यांच्याशी बोललो. फोनवरील संभाषणात त्यांनी सांगितले की, “ही मिरवणूक 19 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या बाइक रॅलीची आहे. लातूरमध्ये सामाजिक सौहार्दाची परिस्थिती आहे कारण गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद एकाच वेळी येते. त्यामुळे दरवर्षी येथे हिंदू आणि मुस्लिम समाज परस्पर विचारविनिमय करून मिरवणूक काढण्यासाठी दोन स्वतंत्र दिवस ठरवतात. यावर्षीही प्रथम गणेश विसर्जन 17 सप्टेंबरला झाले आणि त्यानंतर 19 सप्टेंबरला ईद-ए-मिलादच्या निमित्ताने बाईक रॅली काढण्यात आली.
आता आम्ही गुगलवर ‘ईद-ए-मिलाद रॅली लातूर’ हा कीवर्ड शोधला. या वेळी, आम्हाला लातूरमधील ईद-ए-मिलाद रॅलीच्या व्हिडिओसह अनेक सोशल मीडिया पोस्ट आढळल्या, ज्या येथे, येथे आणि येथे पाहता येतील. व्हायरल झालेल्या क्लिपप्रमाणे सर्व व्हिडिओंमध्ये मिरवणुकीच्या सुरुवातीला एक व्यक्ती काळ्या कारमध्ये तिरंगा झेंडा हातात घेऊन उभा असल्याचे आम्हाला आढळले. ज्याच्या मागे संपूर्ण दुचाकी मिरवणूक निघाली आहे.
तपासातून, आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो की, महाराष्ट्रातील लातूर येथे ईद-ए-मिलादच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या बाइक रॅलीचा व्हिडिओ हरियाणातील मेवात येथे काँग्रेस निवडणूक प्रचार मिरवणूक असल्याचा खोटा दावा करून शेअर केला जात आहे.
Sources
Google Maps
Phonic Conversation with Journalist from Latur, Ashfaq Pathan.
Phonic Conversation with Latur Police.
Social Media Posts.
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी कोमल सिंग यांनी केले असून इथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Ishwarachandra B G
February 8, 2025
Prasad Prabhu
January 29, 2025
Vasudha Beri
January 3, 2025