Authors
Claim
सीतामाता श्रीलंकेतील अशोकवनात बसलेली शिळा अयोध्येला आणण्यात आली ते दर्शविणारा हा व्हिडीओ आहे.
Fact
कुशीनगर, उत्तर प्रदेश येथे अश्विन पौर्णिमा आणि अभिधम्म दिनानिमित्त श्रीलंकेतून पवित्र बुद्ध अवशेषाचे आगमन झाल्याबद्दल औपचारिक स्वागत करतानाचा व्हिडीओ चुकीचा संदर्भ देऊन व्हायरल करण्यात आला आहे.
सीतामाता श्रीलंकेतील अशोकवनात बसलेली शिळा अयोध्येला आणण्यात आली ते दर्शविणारा हा व्हिडीओ आहे. असा दावा करण्यात सोशल मीडियावर एका व्हिडिओच्या माध्यमातून केला जात आहे.
“श्रीलंकेच्या अशोक वनात माता सीता ज्या दगडावर बसली होती. तो दगड श्रीलंकेच्या विमान कंपनीने अयोध्येत आणला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मन्य योगीजी स्वतःहून आले आणि त्यांचे भक्तिभावाने स्वागत केले.”
Fact Check/Verification
Newschecker ने व्हायरल व्हिडीओचे किफ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला अनेक सर्च रिपोर्ट मिळाले.
आम्हाला २० ऑक्टोबर २०२१ रोजी टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेला एक व्हिडीओ रिपोर्ट मिळाला. “Sri Lankan flight welcomed at Kushinagar International Airport” असे त्याचे शीर्षक आहे. “बुधवारी उत्तर प्रदेशच्या कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर श्रीलंकेच्या विमानाचे स्वागत करण्यात आले. योगी आदित्यनाथ यांनी विमानतळावर बुद्ध अवशेषांचे स्वागत केले. श्रीलंकेच्या १२३ प्रतिनिधींचा समूह या अवशेषांसह उपस्थित होता.” अशी माहिती आम्हाला वाचायला मिळाली.
याप्रकरणी आणखी तपास करताना आम्हाला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर २० ऑक्टोबर २०२१ रोजी केलेले ट्विट सापडले. यामध्ये व्हायरल व्हिडीओ समाविष्ट आहे. “कुशीनगर, उत्तर प्रदेश येथे अश्विन पौर्णिमा आणि अभिधम्म दिनानिमित्त श्रीलंकेतून पवित्र बुद्ध अवशेषाचे आगमन झाल्याबद्दल औपचारिक स्वागत. तसेच श्रीलंका आणि जगभरातील बौद्ध भिक्खूंचे स्वागत केले.” असे या ट्विटमध्ये लिहिण्यात आले आहे.
बुद्धाचे अवशेष उत्तरप्रदेशात आल्याच्या व्हिडिओला सीतामाता अशोकवनात बसलेल्या दगडाचे आगमन असा चुकीचा संदर्भ जोडून व्हायरल करण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले.
श्रीलंकेच्या अशोकवनातून शिळा घेऊन आलेल्या प्रतिनिधींसंदर्भातील बातमी आम्हाला पाहायला मिळाली. मात्र व्हायरल व्हिडिओतील व्हिज्युअल्स त्यामध्ये नव्हते. @IndiaTV ने २८ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रकाशित केलेला व्हिडीओ रिपोर्ट येथे पाहता येईल.
तसेच यासंदर्भात hindi.news18.com ने २७ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रसिद्ध केलेला रिपोर्ट येथे वाचता येईल.
Conclusion
कुशीनगर, उत्तर प्रदेश येथे अश्विन पौर्णिमा आणि अभिधम्म दिनानिमित्त श्रीलंकेतून पवित्र बुद्ध अवशेषाचे आगमन झाल्याबद्दल औपचारिक स्वागत करतानाचा व्हिडीओ चुकीचा संदर्भ देऊन व्हायरल करण्यात आला आहे. हे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Result: Missing Context
Our Sources
Video by Times of India, Dated, October 20, 2021
Tweet by Kiran Rijiju, Dated, October 20, 2021
Video by India TV, Dated, October 28, 2021
(हे आर्टिकल यापूर्वी आमच्या कन्नड आणि मल्याळम टीमने केले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा