Fact Check
Weekly Wrap: ज्येष्ठांना विशेष अनुदान ते वाघाचा हल्ला पर्यंतच्या दाव्यांचे फॅक्ट चेक
नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही सोशल मीडियावर अनेक फेक दावे व्हायरल झाले. 65 वर्षांवरील ज्येष्ठांना दरमहा ₹7,000 व यात्रेसाठी ₹15,000 अनुदान मिळणार, असा दावा करण्यात आला. भारताच्या महिला विश्वकप विजयाचा जल्लोष मुंबईत होताना असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून झाला. कर्नाटकातील बेळगावमध्ये बसवलेल्या अंडरग्राउंड हायड्रॉलिक (स्मार्ट बिन) कचरा पेटीची व्यवस्था असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. बैलाच्या हल्ल्यातून एका मुलाला गाईने वाचविले असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील वन विभागाच्या अतिथीगृहावर वाघाने हल्ला केला, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

65 वर्षांवरील ज्येष्ठांना दरमहा ₹7,000 व यात्रेसाठी ₹15,000 अनुदान?
65 वर्षांवरील ज्येष्ठांना दरमहा ₹7,000 व यात्रेसाठी ₹15,000 अनुदान मिळणार, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

जल्लोषाचा व्हिडिओ मुंबईचा नाही
भारताच्या महिला विश्वकप विजयाचा जल्लोष मुंबईत होताना असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.

अंडरग्राउंड हायड्रॉलिक स्मार्ट बिनचा व्हिडीओ बेळगावचा नाही
कर्नाटकातील बेळगावमध्ये बसवलेल्या अंडरग्राउंड हायड्रॉलिक (स्मार्ट बिन) कचरा पेटीची व्यवस्था असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा अंशतः खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

बैलाच्या हल्ल्यातून मुलाला वाचवणाऱ्या गायीचा व्हिडिओ AI जनरेटेड
बैलाच्या हल्ल्यातून एका मुलाला गाईने वाचविले असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे उघड झाले.

चंद्रपूरच्या अतिथीगृहावर वाघाचा हल्ला?
महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील वन विभागाच्या अतिथीगृहावर वाघाने हल्ला केला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे उघड झाले.