Authors
याचे फॅक्ट चेक न्यूजचेकर हिंदीने केले असून हा लेख अर्जुन देवडिया याने लिहिला आहे.
सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता आमीर खानचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. त्या फोटोत काही लोक हातात आरतीची थाळी दिसत आहे. यात असा दावा केलाय की, चित्रपट पीकेमध्ये हिंदू देव-देवतांचा अपमान करणाऱ्या आमीर खानचा लाल सिंह चड्ढा फ्लॉप झाल्यानंतर पूजाअर्चाची मदत घ्यावी लागत आहे. हा फोटो फेसबुक आणि ट्विटरवर शेअर केला आहे.
या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे वाचू शकता.
बातमीनुसार, ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला लाल सिंह चड्ढा चित्रपटाने देशात फारच निराशाजनक कलेक्शन केले आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की, लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लॉप होण्यामागे हिंदूंनी चित्रपटावर टाकेलला बहिष्कार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी लाल सिंह चड्ढा चित्रपटावर एक वर्ग बहिष्कार टाकला होता. लोकांच्या या नाराजीचे कारण म्हणजे आमीर खानने केलेले जुने विधान, त्याचा पीके चित्रपट आणि तुर्कीच्या फर्स्ट लेडी एमीन एर्दोगन यांच्याशी झालेली भेट आहे. हिंदूंच्या एकजुटीने लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लॉप झाला. या भीतीने हिंदूद्वेषी आमीर आता पूजा करू लागला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोद्वारे असे म्हटले जात आहे.
Fact Check / Verification
व्हायरल फोटो गुगल रिव्हर्स करून शोधल्यावर आम्हांला फिल्मी बीट नावाच्या संकेतस्थळावरील फोटो गॅलरीत मिळाला. त्यानुसार, २५ सप्टेंबर २०१७ मध्ये आमीर खानचा आरती करतानाचा हा फोटो गुजरातमधील वडोदरा येथे नवरात्रीच्या पूजेचा आहे.
त्यानंतर काही कीवर्डच्या मदतीने शोधल्यावर आम्हांला सप्टेंबर २०१७ मधील प्रकाशित झालेली बातमी मिळाली. २५ सप्टेंबर २०१७ डेक्कन क्रॉनिकलच्या बातमीनुसार, नवरात्रीच्या कार्यक्रमासाठी वडोदरा येथे आला होता, जिथे त्याने दुर्गा मातेची आरती देखील केली होती.
नवरात्रीच्या पूजेच्या दरम्यान आमीरने सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटाचे प्रमोशन केले होते. या कार्यक्रमाचे काही व्हिडिओ यु ट्यूबवर उपलब्ध आहे.
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, व्हायरल होणारा आमीर खानचा फोटो जवळपास पाच वर्षांपूर्वीचा आहे. याचा लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लॉप होण्याशी काहीही संबंध नाही.
Result : False
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.