Friday, April 26, 2024
Friday, April 26, 2024

HomeFact CheckViralराजस्थानातील करौलीमध्ये हिंसेच्या नावाने शेअर होणारा दावा भ्रामक आहे

राजस्थानातील करौलीमध्ये हिंसेच्या नावाने शेअर होणारा दावा भ्रामक आहे

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यात असा दावा केलाय की, राजस्थानातील करौलीमध्ये मुस्लिम तरुणांनी हिंदूंना धमकी दिली.

राजस्थानातील करौलीमध्ये हिंदू नववर्षाच्या निमित्ताने २ एप्रिल २०२२ स्थानिक लोकांनी दुचाकीची रॅली काढली होती. त्या रॅलीवर दगडफेक झाली. त्यानंतर दोन समुदायांमध्ये भांडणे झाली. त्यात अनेक लोकं जखमी झाले.

एबीपी माझाच्या बातमीनुसार, पोलिसांनी या हिंसेत सामील झालेल्या ४६ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यातच सोशल मीडियावर युजर्स आपापल्या राजकीय आणि वैचारिक गोष्टींनुसार या घटनेचा अर्थ लावत आहे. 

यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यात असा दावा केलाय की, राजस्थानातील करौलीमध्ये मुस्लिम तरुणांनी हिंदूंना धमकी दिली.

Fact Check / Verification

राजस्थानातील करौलीमध्ये मुस्लिम तरुणांनी हिंदूंना धमकी दिली, असा दावा केला जात होता. तो व्हिडिओ तपासण्यासाठी आम्ही त्याची एक की-फ्रेम गुगलवर टाकून शोधण्याचा प्रयत्न केला. 

या तपासात आम्हांला कुठलीही माहिती मिळाली नाही. व्हायरल व्हिडिओतील आवाजाच्या साहाय्याने आम्ही ‘स्टार हॉटेलच्या पुढे’ असा कीवर्ड ट्विटरवर टाकून शोधले. यात आम्हांला सोशल मीडियावर २०२० पासून उपलब्ध असलेली एक व्हिडिओ मिळाली. 

ट्विटरवर सर्च केलेला स्क्रिनशॉट

परीतुश चौधरी नावाच्या ट्विटर युजरने २ मे २०२० रोजी हा व्हिडिओ शेअर केला होता.

त्यानंतर आम्हांला हा व्हिडिओ परीतुश चौधरी नावाच्या फेसबुक युजरने २ मे २०२० रोजी शेअर केलेली एक पोस्ट मिळाली.

व्हायरल व्हिडिओ राजस्थानातील करौलीमधील आता घडलेल्या कुठल्याही जातीय हिंसाचारासंबंधी नाही. आम्ही या बाबत अजून माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. 

या प्रक्रियेत आम्हांला ६ एप्रिल २०२२ रोजी केलेले राजस्थान पोलिसांचे एक ट्विट मिळाले. त्यांनी ट्विट करून सांगितले की, व्हायरल व्हिडिओ राजस्थानातील करौलीचा नाही तर हैदराबादच्या निजामाबादमधील आहे.

राजस्थान पोलीस यांच्या ट्विटरच्या मदतीने स्टार हॉटेलविषयी काही कीवर्ड टाकून गुगलवर शोधण्याचा प्रयत्न केला. 

यात आम्हांला जस्ट डायल या संकेतस्थळावर हैदराबादच्या निजामाबादमधील स्टार हॉटेल नावाचे एक हॉटेल मिळाले. जे व्हायरल व्हिडिओच्या मागे हॉटेलचा फोटो दिसत आहे.

हे वाचू शकता : शेतात विहीर खोदतानाचा तो व्हिडिओ अमरावतीचा नाही, चुकीचा दावा व्हायरल होतोय

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या तपासात हे स्पष्ट झाले की राजस्थानातील करौलीमध्ये मुस्लिम तरुणांनी हिंदूंना धमकी दिली, असा केला जाणारा दावा भ्रामक आहे. 

सदर व्हायरल व्हिडिओ २०२० पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. ही घटना राजस्थानातील करौलीमधील जातीय हिंसाचार २०२२ च्या एप्रिल महिन्यात घडलेली आहे.

Result : False Context

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular