Friday, April 19, 2024
Friday, April 19, 2024

HomeFact CheckViralअमेरिकेच्या १०० डॉलरच्या नोटेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे? याचे सत्य जाणून...

अमेरिकेच्या १०० डॉलरच्या नोटेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे? याचे सत्य जाणून घ्या

Claim

सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला जात आहे. त्यात असा दावा केलाय की, अमेरिकेच्या १०० डॉलरच्या नोटेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे.

फोटो साभार : Facebook/Kiran Kharat

Fact

याची तथ्य पडताळणी करण्यासाठी आम्ही गुगलवर ‘अमेरिका १०० डॉलर नोट’ असं टाकून शोधले. तेव्हा आम्हांला अमेरिकेच्या चलनाची अधिकृत संकेतस्थळ मिळाले. याची तथ्य पडताळणी आधी न्यूजचेकर मराठीने केली आहे. 

१९९० पासून ते आतापर्यंत अमेरिकेच्या नोटेत थोडेफार बदल केले, पण त्यांनी कधीही बेंजामिन फ्रँकलिन यांचा फोटो नोटेवरून हटवला नाही. अमेरिकेन डॉलरच्या नोटेवर आतापर्यंत अमेरिकेने कधीही महापुरुषांचा फोटो छापलेला नाही. 

फोटो साभार : Facebook/Dipak Ratnaparkhi, US Currency

Result : Manipulated Media/Altered Photo/Video

जर तुम्हांला माझी तथ्य पडताळणी आवडत असेल तर असेच विविध लेख या दुव्यावर टिचकी मारून तुम्ही वाचू शकता.


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

1 COMMENT

  1. खरं म्हणजे अशा बोगस आणि भंपक अफवांचा प्रसार कोण करतं त्याचा शोध घेणं गरजेचं आहे… आणि हि न्यूज ज्या व्यक्तिच्या सुपिकता डोळ्यातून निघाली असेल तो नक्कीच डॉ. आंबेडकरांचा अनुयायी नसणारच याची खात्री आहे कारण, किमान आंबेडकरी अनुयायांना एवढं डोकं नक्कीच आहे की, ते अमेरिकन नोटेवर भारतीय महापुरुषांचे… भलेही त्यांचं योगदान जगन्मान्य असेल तरीही अमेरिकाच काय कोणताही पुर्णतः स्वतंत्र देश त्यांच्या देशातील महान व्याक्तिंचाच विचार करतील…एवढा विचार नक्कीच करु शकतात… त्यामुळे ते असल्या अफवा फैलावणार नाहीत… हे कुणा दुसर्‍यांचं काम नक्की आहे ज्यांना बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा समाज आणि अनुयायी या दोहोचाही अपमान करुन हे लोक मंदबुद्धी वगैरे असतात असं इतरांच्या डोक्यात समज पाडून देण्यासाठी हे लोक प्रयत्नशील असतात… अशांचा शोध लावण खरंच गरजेचं आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular