Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckViralफ्रान्सच्या संसदेत ‘कुराण’ला दहशतवादाचा उगम म्हटलेले नाही, खोटा दावा व्हायरल

फ्रान्सच्या संसदेत ‘कुराण’ला दहशतवादाचा उगम म्हटलेले नाही, खोटा दावा व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

फ्रान्सच्या संसदेत ‘कुराण’ला दहशतवादाचा उगम म्हटले असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. फ्रान्समध्ये पैगंबर मोहम्मद यांच्या व्यंगाचित्रावरून एका शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला. त्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्लाम आणि कट्टरपंथीय विचारधारेबद्दल वादग्रस्त विधान केले. अनेक इस्लामिक राष्ट्रप्रमुखांनी त्यांच्यावर टिका केली. याच दरम्यान ‘कुराण’वर भर संसदेत टीका करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. दावा करण्यात येत आहे की, हा व्हिडिओ फ्रान्सच्या संसदेतील आहे. या एका मिनिटाच्या व्हिडिओ क्लिप मध्ये एक व्यक्ती हातात ‘कुराण’ घेऊन भर संसदेत वादग्रस्त विधान करत असल्याचे दिसत आहे. यावर अनेक यूजर्सनी दावा केली आहे की, फ्रान्समधील शिक्षकाच्या हत्येनंतर तेथील संसदेत कुराण दहशतवादाचे उगमस्थान म्हटले गेले आहे.

संग्रहित/ फेसबुक

Fact Check/Verification

व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेमका कुठला आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. गूगल रिव्हर्स इमेजच्या मदतीने व्हिडिओतील काही स्क्रीनशाॅट काढून शोध घेतला असता आम्हाला हा व्हिडिओ बेल्जियमच्या संसदेतील असल्याचे आढळून आले. बेल्जियमधील उजव्विया विचारसरणीचे विरोधी पक्षनेते Filip Dewinter यांनी 22 जून 2015 रोजी संसदेत ‘कुराण’ हातात घेऊन वादग्रस्त टीका केली होती. 

https://www.gettyimages.in/detail/news-photo/vlaams-belang-filip-dewinter-holds-the-quran-during-a-news-photo/461954110

याशिवाय nieuwsbla नावाच्या डच वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीत, फिलीप यांनी कुराणवर टीका करताना बेल्जियममधील मशिदींमध्ये कट्टरवादाचे शिक्षण दिले जाते असा आरोप केला असल्याचे म्हटले आहे.

फिलीप यांनी स्वत आपल्या भाषणाचा फोटो 22 जानेवारी 2015 रोजी ट्विट केली होता.

Conclusion

यालरुन हेच सिद्ध होते की, पाच वर्षापूर्वी बेल्जियमच्या संसदेत कुराणविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ 2020 मध्ये फ्रान्सच्या संसदेत कुराणबद्दल वादग्रस्त विधानाचा असल्याचा चुकीचा दाव्याने सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

Result: Misleading

Our Source

Gettyimages- https://www.gettyimages.in/detail/news-photo/vlaams-belang-filip-dewinter-holds-the-quran-during-a-news-photo/461954110

Nieuwsblad- https://www.nieuwsblad.be/cnt/dmf20150122_01488073

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular