Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
मुस्लिम भगिनींची प्रजनन क्षमता जास्त असल्याने त्यांना सहा हजार देणार असे संजय राऊत म्हणाले.
Fact
बनावट स्क्रीनशॉटच्या माध्यमातून हा दावा करण्यात आला आहे. खासदार संजय राऊतांनी असे विधान केलेले नाही. दरम्यान पुढारी न्यूजनेही अशी बातमी प्रसारित केलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पुढारी न्यूजचा लोगो वापरून संजय राऊतांचे विधान असे सांगत एक व्हायरल स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर पसरत आहे. “उध्दव ठाकरे परत मुख्यमंत्री झाल्यावर लाडक्या बहिणीला ३०००/- रुपये देणार तसेच मुस्लीम भगिनीची प्रजनन क्षमता जास्त असल्यामुळे त्यांना पौष्टिक आहार योजने अंतर्गत महीना ६०००/- रुपये देणार.” असे विधान शिवसेना नेते आणि खासदारांनी केले असल्याचे हा दावा सांगतो.
आम्हाला फेसबुक आणि X वर असंख्य युजर्सनी हा दावा केला असल्याचे निदर्शनास आले.
दाव्यांचे संग्रहण येथे आणि येथे पाहता येईल.
“काय तर म्हणे मुस्लीम महिलांची प्रजनन क्षमता जास्त आहे म्हणून हिन्दुं महिलांंच्या डबल देणार. तुष्टीकरणाची पण हद्द झाली आता!” अशा कॅप्शनखाली हा दावा केला जात आहे.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या नावे व्हायरल होत असलेले विधान त्यांनी केले आहे का? हे शोधण्याचा आम्ही सर्वप्रथम प्रयत्न केला. संबंधित कीवर्डसच्या माध्यमातून आम्ही Google वर शोध घेतला, मात्र आम्हाला त्याबद्दल माहिती मिळाली नाही. संजय राऊत यांनी असे विधान केले असते तर नक्कीच अधिकृत माध्यमांनी त्याबद्दल वृत्त प्रकाशित केले असते, मात्र तसे आढळले नाही.
संजय राऊत यांनी यासंदर्भात आपल्या सोशल मीडिया अकौंट्सवर काही भाष्य केले आहे का? हे आम्ही शोधले. मात्र त्यांच्या X किंवा फेसबुक पेजवर आम्हाला अशा कोणत्याही विधानाची माहिती मिळाली नाही.
पुढील तपासात आम्ही ‘पुढारी न्यूज’ चॅनेलचे संपादक तुळशीदास भोईटे यांच्याशी संपर्क साधला. दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात त्यांनी, “व्हायरल स्क्रिनशॉट खोटा आणि बनावट असल्याची माहिती दिली. पुढारीने अशी बातमी प्रसारित केली नाही. त्यामध्ये दिसत असलेला फॉन्ट पुढारीचा नाही. विशेष म्हणजे ब्रेकिंग न्यूज अशापद्धतीने देण्याची पद्धत पुढारीची नाही.” अशी माहिती दिली.
दरम्यान व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये ज्या पेहरावात संजय राऊत दिसत आहेत त्याच पेहरावात असताना त्यांची बाईट पुढारी न्यूजने चालविली होती. ती बातमी येथे पाहता येईल. मात्र याच बातमीचा स्क्रिनशॉट व्हायरल दाव्यात वापरण्यात आला आहे की नाही याची पुष्टी आम्ही स्वतंत्रपणे करू शकलेलो नाही.
आम्ही खासदार संजय राऊत यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. तेथे आम्हाला असे विधान संजय राऊत यांनी केले नसल्याचेच समजले. दरम्यान आम्ही थेट संजय राऊत यांच्याशीही संपर्क केला असून त्यांच्या प्रतिक्रियेनंतर हा लेख अपडेट केला जाईल.
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात खासदार संजय राऊत यांचे विधान असे सांगत व्हायरल झालेला पुढारी न्यूजचा लोगो असलेला स्क्रिनशॉट खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Google Search
Social Media Accounts of MP Sanjay Raut
Conversation with Mr. Tulasidas Bhoite, Editor, Pudhari News
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad S Prabhu
April 12, 2025
Prasad S Prabhu
April 11, 2025
Kushel Madhusoodan
April 8, 2025