Authors
टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताच्या पराभवानंतर विराट कोहलीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात होता.ABP ने आपल्या ओपिनियन पोलमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या आघाडीचा अंदाज वर्तवला आहे,असा दावा एका व्हिडिओद्वारे करण्यात आला.यापूर्वी देशाच्या काही भागात झालेल्या भूकंपानंतर एका कुत्र्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.कुत्र्याचा हा व्हिडिओ दिल्ली-एनसीआरमधील घराजवळचा असल्याचा दावा करण्यात आला होता.खाण्याच्या सोड्याने कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो त्याचप्रमाणे,इतर अनेक प्रकरणांवर व्हायरल झालेल्या खोट्या दाव्यांचे सत्य आमच्या या अहवालात वाचता येईल.
विराट कोहलीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली का?
T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर एक दावा वेगाने व्हायरल झाला. या पराभवानंतर विराट कोहलीने निवृत्ती जाहीर केल्याचा दावा केला जात होता. आमच्या तपासणीत हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले.
कुत्र्याच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओचा दिल्ली-एनसीआरमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपाशी काहीही संबंध नाही
भूकंपानंतर जागे झालेल्या एका गेटला बांधलेल्या कुत्र्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.दिल्ली-एनसीआरमधील एका सोसायटीतील हा कुत्रा असल्याचा दावा करण्यात आला होता.आमच्या तपासणीत हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले.
एबीपी न्यूजच्या ओपिनियन पोलने दाखविले नाही काँग्रेसला भाजपपेक्षा पुढे,खोटा दावा होत आहे व्हायरल
एबीपी न्यूजने आपल्या ओपिनियन पोलमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला भाजपपेक्षा पुढे घोषित केल्याचा दावा करीत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.आमच्या तपासणीत हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले.
बेकिंग सोडा कॅन्सर वर उपचार करू शकतो?
खाण्याचा अर्थात बेकिंग सोड्याने कर्करोग बरा होऊ शकतो असा दावा या आठवड्यात सोशल मीडियावर करण्यात आला आहे.यासंदर्भातील अनेक संदेश व्हायरल करण्यात आले.आमच्या तपासणीत हा दावा खोटा असल्याचे आढळले आहे.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी,दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा:9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in