Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
या आठवड्यात प्रामुख्याने गाजला तो ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या न झालेल्या निधनाचा दावा. अद्याप उपचार सुरु असताना या सिलिब्रिटीला डेथ हुवॉक्स ला सामोरे जावे लागले. त्यांच्या निधनाच्या तीन दिवस आधीपासूनच त्यांच्या निधनाचे वृत्त आणि श्रद्धांजली व्यक्त करणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्या. हार्दिक पटेल ने तिकीट मिळताच भाजपवर तोंडसुख घेतले असो वा वादग्रस्थ फरार मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईक ने फिफा वर्ल्ड कप मध्ये धर्मांतरण करविल्याचा दावा असो हे मुद्दे सोशल मीडियावर चांगलेच गाजले. तुमची वीज कापायची नसेल तर संपर्क साधा अशी भीती घालून होत असलेले स्कॅम संभ्रम निर्माण करणारे ठरले. हिमालया या कंपनीला व्हायरल दाव्यान्नी पुन्हा एकवार टार्गेट केले तर एक जुना व्हिडीओ शेयर करून पुन्हा एकदा फिफा वर्ल्ड कप मध्ये सामूहिक धर्मांतरण झाल्याचा दावा व्हायरल करण्यात आला. राहुल गांधी यांचा अनुवादक मधूनच निघून गेला या आणि अनेक प्रकरणांवर व्हायरल झालेल्या खोट्या दाव्यांचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरु असताना आणि त्यांचे निधन होण्यापूर्वीच त्यांच्या निधनाची बातमी देऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
गुजरात येथे भाषण करताना राहुल गांधी यांचा अनुवादक मधूनच निघून गेला. श्रोत्यांनी आपण हिंदीतच बोला अशी विनंती केल्याने ही कृती झाली. मात्र दावा करणाऱ्यांनी अनुवादक गांधींना कंटाळला अश्या पोस्ट व्हायरल केल्या. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळून आले.
फिफा वर्ल्ड कप मध्ये सामुदायिक धर्मांतरण झाल्याची पोस्ट व्हायरल झाली. यासंदर्भात काही व्हिडीओ पसरविण्यात येत आहेत. आम्ही केलेल्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे दिसून आले.
फिफा वर्ल्ड कप मध्येच वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईक याने काही नागरिकांचे धर्मांतरण केल्याचा दावा करण्यात आला होता. हा दावा चुकीचे संदर्भ देऊन करण्यात आल्याचे आमच्या तपासात उघड झाले.
वीजबिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित होईल असे सांगून भीती दाखवून लूट करण्याचा प्रयत्न झाला. आमच्या तपासात हे सारे स्कॅम असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Prasad S Prabhu
April 19, 2025
Prasad S Prabhu
May 19, 2024
Prasad S Prabhu
April 12, 2025