Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: या आठवड्यात मनसेच्या निलेश माझिरेंपासून ते संभाजीराजे छत्रपती यांच्यापर्यंत व्हायरल...

Weekly Wrap: या आठवड्यात मनसेच्या निलेश माझिरेंपासून ते संभाजीराजे छत्रपती यांच्यापर्यंत व्हायरल झालेल्या मुख्य दाव्यांची तथ्य पडताळणी

टीव्ही ९ मराठी यांनी मनसेचे निलेश माझिरे २० कार्यकर्त्यांसह शिवसेनेत करणार असल्याची बातमी दिली. त्याचबरोबर संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाने लोकमतचा एक फोटो व्हायरल झाला. हे दोन्ही दावे आमच्या पडताळणीत चुकीचे ठरले. न्यूजचेकरने या आठवड्यात अशाच काही दाव्यांची तथ्य पडताळणी केली आहे. तुम्ही हे विकली रॅप (Weekly Wrap) संक्षिप्तपणे इथे वाचू शकता.

मनसेचे निलेश माझिरे यांनी खरंच मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला? याचे सत्य जाणून घ्या

मनसेचे निलेश माझिरे २० कार्यकर्त्यांसह शिवसेनेत करणार असल्याची बातमी टीव्ही ९ मराठीने दाखवली. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

मोदी सरकार खरंच कायदा ३० अ दुरुस्त करण्याच्या तयारीत आहे? भ्रामक दावा व्हायरल

भारतीय संविधानाच्या कलम ३० अ मध्ये मोदी सरकार दुरुस्ती करण्याच्या तयारीत आहे. पण मुळात संविधानात कलम ३० अ अस्तित्वातच नाही. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरंच औरंगजेबाच्या मुलाच्या थडग्यावर फुले अर्पण केली? याचे सत्य जाणून घ्या

अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेबाच्या तर पंतप्रधान मोदी औरंगजेबाच्या मुलाच्या थडग्यावर फुले अर्पण करत आहे, असा दावा करणारा फोटो व्हायरल झाला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाने व्हायरल झालेला लोकमतचा फोटो खरा आहे? याचे सत्य जाणून घ्या

संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाने लोकमताचा एक फोटो व्हायरल झाला. पण आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular