सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या घटनेबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. या आठवड्यात देखील, युजर्सनी अनेक बातम्यांबाबत वेगवेगळे दावे शेअर केले, ज्यामध्ये अनेक दावे दिशाभूल करणारे किंवा खोटे होते. आमच्या टीमने अशा अनेक फेक दाव्यांची वस्तुस्थिती तपासली आहे.

व्हायरल फोटो नेपाळच्या पर्वतात सापडलेल्या 201 वर्षीय बौद्ध भिक्खूचा आहे?
एका सोशल मीडिया यूजरने हा फोटो शेअर करत लिहिले की, ‘नेपाळच्या पर्वतांमध्ये एक तिबेटी साधू सापडला आहे. वयाच्या 201 व्या वर्षी ते जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती असल्याचे मानले जाते. तो खोल समाधी किंवा ध्यानाच्या अवस्थेत असतो, ज्याला “ताकते” म्हणतात. पण हे सत्य नाही. याचे संपुर्ण फऑॅक्ट चेकिंग इथे वाचा.

राम मंदिराच्या विरोधात बोलल्याबद्दल इम्रान खानची इस्लामिक देशांच्या परिषदेतून हकालपट्टी केली?
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचा निषेध केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची इस्लामिक देशांच्या परिषदेतून हकालपट्टी केल्याचा दावा करणारा एक व्हायरल संदेश फेसबुक आणि ट्विटरसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. पण हे सत्य नाही. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

साहित्य संमेलनाची सुरुवात सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत कुराणातील आयत वाचून करण्यात आली?
साहित्य संमेलनाची सुरुवात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत कुराणातील आयत वाचून करण्यात आली असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड तसेच तेथील लोक दुवा मागत असल्याचे फोटोत दिसत आहे. पण हे स्तय नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

गर्भवती महिलेचा जीव वाचवणाऱ्या चिमुरडीचा हा व्हिडिओ खरा नाही
रस्त्याच्या कडेला बंद पडलेल्या ऑटोरिक्षात एक गर्भवती महिला बसलेली आहे, ती प्रसूती वेदनांनी तळमळताना दिसते. रिक्षाचालक रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची मदत मागताना दिसतो,पण त्याच्या मदतीला कोणी येत नाही. पणएका लहान मुलीने गर्भवती महिलेचा जीव वाचवल्याचे या व्हिडिओत दिसते. पण हे खरे नाही. हा जागृतीसाठी तयार करण्यात आलेला स्क्रिप्टेड व्हिडिओ आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचा नाही व्हायरल व्हिडिओ, जाणून घ्या सत्य
जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याच्या दाव्याने सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तामिळनाडूच्या कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या दुःखद निधनानंतर, एक Mi 17 क्रॅश लँडिंग दर्शविणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. व्हायरल दावा चुकीचा आहे. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.