सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या घटनेबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. या आठवड्यात देखील, युजर्सनी अनेक बातम्यांबाबत वेगवेगळे दावे शेअर केले, ज्यामध्ये अनेक दावे दिशाभूल करणारे किंवा खोटे होते. आमच्या टीमने अशा अनेक फेक दाव्यांची वस्तुस्थिती तपासली आहे.

एका आईने आपल्या बाळाला वाचवण्यासाठी प्राणाचाही त्याग केला?
‘एका आईने आपल्या बाळाला वाचवण्यासाठी प्राणाचाही त्याग केला’ या कॅप्शनसह सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर होत आहे, ज्यामध्ये नवजात बाळ आपल्या आईला मिठी मारून रडताना दिसत आहे. काही युजर्सनी या व्हिडीओमधून घेतलेल्या फोटोसोबत आणखी एक फोटो शेअर केला आहे, पण आईने बाळासाठी प्राणत्याग केल्याचा व भावूक होऊन डाॅक्टर रडत असल्याचा दावा देखील चुकीचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

आम आदमी पार्टीने आपल्या पोस्टरमध्ये झाड़ूच्या जागी अपशब्द लिहिला आहे?
आम आदमी पार्टीने आपल्या पोस्टरमध्ये झाड़ूच्या जागी अपशब्द लिहिला असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा तर मणिपुरमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू होते आहे. राजकीय जानकार मानतात की पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये आम आदमी पार्टी इतर राज्यांच्या तुलनेत मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे. याचे फॅक्ट चेक इथे वाचा.

लहानपणी खाणीत काम केलेल्या जिल्हाधिका-याची भावनिक पोस्ट खोटी, हे आहे सत्य
लहानपणी खाणीत काम केलेल्या जिल्हाधिका-याची भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मलप्पुरमच्या जिल्हाधिकारी म्हणून ओळखल्या जाणार्या ‘राणी सोयमोई’ यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत झालेल्या संवादाच्या उता-याची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. पण हे खरे नाही. व्हायरल पोस्ट खोटी आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.