Saturday, December 21, 2024
Saturday, December 21, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: कोरोना आणि इतर काही मुद्दे, सप्ताहभरात सोशल मीडियात व्हायरल झालेल्या...

Weekly Wrap: कोरोना आणि इतर काही मुद्दे, सप्ताहभरात सोशल मीडियात व्हायरल झालेल्या दाव्यांचे फॅक्ट चेक

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

सोशल मीडिया हे असे एक माध्यम आहे जेथे दररोज फेक न्यूज मोठ्या प्रमाणात शेअर होतात. सोशल मीडिया युजर्स दिशाभूल करणारी किंवा चुकीची माहिती शेअर करताना दिसतात. या आठवड्यात असेच काही घडले. कोरोना लस ते राजकीय घडामोडींबाबत तसेच इतर अनेक विषयांवर युजर्सनी या आठवड्यात चुकीची माहिती शेअर केली. आमच्या टीमने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला आहे आणि त्यांचे सत्य आपल्यासमोर मांडले आहे.

कर्नाटकात पुजा-यांनी सरकारी कर्मचा-यांना दानपेटीतील पैसे काढण्यास विरोध केला?

कर्नाटकात मंदिरातील पुजा-यांनी दानपेटीतील रक्कम काढण्यास सरकारी कर्मचा-यांना विरोध केला असल्याच्या दाव्याने एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. एका मंदिरात काही लोक आणि पुजा-यांमध्ये बाचबाची झालेली दिसते. पण हे सत्य नाही. हा व्हिडिओ जुना आहे तसेच तो चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे.याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

कोरोनाची लस घेणा-यांचा दोन वर्षात मृत्यू होणार असल्याचा मेसेज व्हायरल

कोरोनाची लस घेणा-यांचा दोन वर्षात मृत्यू होणार असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात ज्या लोकानी घेतली आहे त्यांच्यासाठी जगण्याची कोणतीही शक्यता नाही असा नोबेल पारितोषिक विजेते ल्यूस मॉन्टॅग्निअर यांनी हा दावा केला असल्याचे म्हटले आहे. पण हे सत्य नाही. सरकारने लस सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

साध्वी प्रज्ञासिंग यांना कोरोनामुळे हाॅस्पिटलमध्ये दाखल केलेले नाही, जुना फोटो व्हायरल

खासदार साध्वी प्रज्ञासिंग यांना कोरोना झाल्यामुळे मुंबईतील कोकिळाबेन अंबानी हाॅस्पिटलमध्ये दाखल केले असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल होत आहे, पण हे सत्य नाही. खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याविषयी चुकीचा दावा व्हायरल झाला आहे. त्यांना कोरोना झाला नसून त्यांचा व्हायरल फोटो हा 2013 मधील आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

मेनका गांधींनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर टिका केली नाही, हे आहे सत्य

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिला पंतप्रधान मोदींवर टीका करीत आहे. दावा केला जात आहे की, भाजपाच्या खासदार मेनका गांधी यांनी मोदी आणि भाजपाला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी भाजप नेत्यांचा खरा चेहरा उघडा पाडला आहे. पण हे सत्य नाही. व्हिडिओतील महिला मेनका गांधी नसून काॅंग्रेस नेत्या आहेत. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular