Fact Check
Weekly Wrap: बिहारमध्ये साडी चोरी ते समृद्धी महामार्गावर खिळे पर्यंतच्या दाव्यांचे फॅक्ट चेक
सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडाही विविध फेक क्लेम्सनी गाजला. बिहार बंद दरम्यान, भाजप महिला मोर्चाच्या नेत्यांनी मुझफ्फरपूरमधील एका दुकानातून साड्या लुटल्या, असा दावा करण्यात आला. गणेश विसर्जनाच्या वेळी मुस्लिमांनी त्यांच्या घराच्या छतावरून मिरवणुकीवर दगडफेक केली, असा दावा करण्यात आला. अलिकडच्या भाषणात नितीश कुमार यांनी भाजपला ‘जुमला पार्टी’ म्हटले, असा दावा करण्यात आला. केंद्राने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आयकर भरण्यापासून सूट दिली आहे, असा दावा करण्यात आला. समृद्धी महामार्गावर प्रवाशांची लूट करण्याच्या उद्देशाने खिळे टाकण्यात आले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर महत्वाच्या दाव्यांचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

बिहार बंद दरम्यान भाजप महिला मोर्चाच्या नेत्यांनी साडीचे दुकान लुटले?
बिहार बंद दरम्यान, भाजप महिला मोर्चाच्या नेत्यांनी मुझफ्फरपूरमधील एका दुकानातून साड्या लुटल्या, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

गणेश विसर्जन यात्रेत मुस्लिमांनी छतावरून दगड फेकले?
गणेश विसर्जनाच्या वेळी मुस्लिमांनी त्यांच्या घराच्या छतावरून मिरवणुकीवर दगडफेक केली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.

अलिकडच्या भाषणात नितीश कुमार यांनी भाजपला ‘जुमला पार्टी’ म्हटले नाही
अलिकडच्या भाषणात नितीश कुमार यांनी भाजपला ‘जुमला पार्टी’ म्हटले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा चुकीच्या संदर्भाने करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले.

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना केंद्राने आयकर भरण्यापासून सूट दिली?
केंद्राने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आयकर भरण्यापासून सूट दिली आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.

समृद्धी महामार्गावर प्रवाशांची लूट करण्याच्या उद्देशाने खिळे टाकण्यात आले?
समृद्धी महामार्गावर प्रवाशांची लूट करण्याच्या उद्देशाने खिळे टाकण्यात आले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे दिसून आले.