या सप्ताहात Newschecker.in ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. महाराष्ट्रातील पत्रकारांना राष्ट्रीय महामार्गावर टोलमाफी व अपघाती विमा कवच मिळाल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला होता तसेच तिरुपति बालाजी मंदिर ट्रस्ट से अध्यक्ष हिंदू नसून ख्रिश्चन आहेतर आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टवर एक मुस्लीम सदस्य असल्याचा दावा देखील या सप्ताहात व्हायरल झाला. याशिवाय दिल्लीत शेतक-यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते राकेश टिकेत यांना राजस्थानात काळे फासल्याचा फोटो देखील सोशल मीडियात शेअर होत आहे.
याशिवाय इतर काही दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप फेक न्यूज वाचू शकता.

महाराष्ट्रातील पत्रकारांना टोलमाफी मिळालेली नाही, सोशल मीडियात व्हायरल झाला चुकीचा दावा
महाराष्ट्रातील पत्रकारांना टोलमाफी मिळाली आहे शिवाय त्यांना पाच लाखांचे विमा कवच देखील देण्यात आले आहे अशी पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अनेक वृत्तपत्रांनी देखील ही बातमी आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे.फेसबुकवर व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये पत्रकारांना टोल टॅक्स माफ केल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्याचे म्हटले आहे. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

तिरुपती बालाजी मंदिर आणि सिद्धिविनायक ट्रस्टसंदर्भात व्हायरल झाला चुकीचा दावा
आंध्र प्रदेशचे प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर आणि मुंबईतील सिद्धी विनायक मंदिर ट्रस्ट संदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल आहे. यात म्हटले आहे की, तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखर रेड्डी हिंदू नसून ख्रिश्चन धर्माचे आहेत, तर सिद्धी विनायक मंदिर ट्रस्टचे एक विश्वस्त मुस्लिम असून त्यांचे नाव सलीम आहे. असा दावा केला जात आहे. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा

शेतकरी नेते राकेश टिकेत यांना राजस्थानात काळे फासण्यात आले आहे का?
सोशल मीडियात एक फोटो व्हायरल होत आहे. यात शेतकरी नेते राकेश टिकेत आणि त्यांच्या साथीदारांच्या चेह-याला काळे फासण्यात आल्याचे दिसत आहे. दावा करण्यात येत आहे की, भारत बंद करण्याचे प्रयत्न करणारे शेतकरी नेते राकेश टिकेत आणि त्यांच्या साथीदारांना राजस्थानमधील पपलाज येथे जनतेने बेदम मारहाण केली आणि चेह-याला काळे देखील फासले. पण हे सत्य नाही. याचे संपूर्ण फॅकट चेकिंग इथे वाचा.

मुकेश अंबानी यांनी अमेरिकेतील skyTran कंपनी विकत घेतली आहे का?
मुकेश अंबानी यांनी अमेरिकेतील skyTran कंपनी विकत घेतली असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात म्हटले आहे की, भारतीय उद्योगपति आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी अमेरिकेतील सर्वात मोठी आयटी कंपनी skyTran विकत घेतली आहे. पण हे अर्धसत्य आहे. अंबानी यांनी या कंपनीत आपले समभाग वाढविलेले आहेत. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.