Authors
मागील आठवड्यातही सोशल मीडियावर झालेल्या खोट्या दाव्यान्नी धुमाकूळ घातला. भारत आणि कॅनडा या देशांमध्ये सुरु असलेल्या राजकीय संघर्षात कॅनडाने भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवी ट्रॅव्हल अडव्हायजरी लागू केली तसेच आरएसएस या हिंदुत्ववादी संघटनेवर बंदी घातली. असे दावे करण्यात आले. तामिळनाडू येथील पारंपारिक मूर्तिकारांवर तेथील सरकार अन्याय करत आहे, असा दावा करण्यात आला. भारतातील हिंदू विद्यार्थ्यांनी हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम विद्यार्थिनीवर अत्याचार केला असे सांगणारा एक दावा झाला. या आणि इतर प्रमुख दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
पारंपरिक गणेश मूर्तिकारांवर तामिळनाडू सरकारचा अन्याय?
तामिळनाडू सरकार हिंदू विरोधी असून सरकारने पारंपारिक गणेश मूर्ती व्यवसाय करणाऱ्यांवर बंदी आणून अन्याय चालविला आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
कॅनडाने नवी ट्रॅव्हल अडव्हायजरी जारी केली नाही
कॅनडा देशाने जम्मू आणि काश्मीरमधील राजनैतिक अडथळ्याच्या दरम्यान भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ‘अनपेक्षित परिस्थिती’ संदर्भात चेतावणी देत ट्रॅव्हल अडव्हायजरी जारी केली आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे निदर्शनास आले.
कॅनडामध्ये आरएसएस वर घातली बंदी?
कॅनडा सरकारने आरएसएस संघटनेवर बंदी घातली आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.
हिंदू विद्यार्थ्यांनी मुस्लिम विद्यार्थिनीवर केले नाहीत अत्याचार
हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम विद्यार्थिनीवर हिंदू विद्यार्थ्यांनी अत्याचार केले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघडकीस आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in न्यूजचेकरचे चॅनल WhatsApp वर Live चालू आहे.