Authors
मागील आठवड्यात सोशल मीडियावर फेक दाव्यांचा सुळसुळाट सुरूच राहिला. आजपासून महिलांना एसटी प्रवासात १०० टक्के सवलत देण्यात आली आहे, असा दावा करण्यात आला. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पुन्हा निवडणुका होणार आहेत, असा दावा झाला. कतारने सर्व 8 भारतीयांची फाशीची शिक्षा रद्द केली आहे, असा दावा करण्यात आला. केरळमध्ये मंदिराचे पुजारी पद मिळविण्यासाठी मुस्लिम शिक्षक मुस्लिमांच्या एका वर्गाला संस्कृत शिकवत आहेत, असा दावा करण्यात आला. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सर्व शाळांमध्ये कुराण शिकवणे बंधनकारक केले आहे, असा दावा करण्यात आला. तेलंगणात काँग्रेसचा विजय होताच तिरंगा ध्वजावर कलमा लिहिला गेला, असा दावा झाला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक आपण या रिपोर्टमध्ये पाहणार आहोत.
महिलांना एसटी प्रवासात १०० टक्के सवलत?
आजपासून महिलांना एसटी प्रवासात १०० टक्के सवलत देण्यात आली आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये फेर निवडणूक नाही
मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पुन्हा निवडणुका होणार आहेत, असा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा तथ्यहीन असल्याचे उघड झाले.
कतारने सर्व 8 भारतीयांची फाशीची शिक्षा रद्द केली?
कतारने सर्व 8 भारतीयांची फाशीची शिक्षा रद्द केली आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे निदर्शनास आले.
केरळमधील शाळांमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांना दिले संस्कृतचे प्रशिक्षण?
केरळमध्ये मंदिराचे पुजारी पद मिळविण्यासाठी मुस्लिम शिक्षक मुस्लिमांच्या एका वर्गाला संस्कृत शिकवत आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
कर्नाटक सरकारने सर्व शाळांमध्ये कुराण शिकवणे बंधनकारक केले?
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सर्व शाळांमध्ये कुराण शिकवणे बंधनकारक केले आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.
तेलंगणात काँग्रेसच्या विजयानंतर तिरंग्यावर कलमा लिहून काढली मिरवणूक?
तेलंगणात काँग्रेसचा विजय होताच तिरंगा ध्वजावर कलमा लिहून मिरवणूक काढण्यात आली, असा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा चुकीचे संदर्भ जोडून झाल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा