Saturday, December 14, 2024
Saturday, December 14, 2024

HomeFact CheckFact Check: तेलंगणात काँग्रेसच्या विजयानंतर तिरंग्यावर कलमा लिहून मिरवणूक काढण्यात आली? जुना...

Fact Check: तेलंगणात काँग्रेसच्या विजयानंतर तिरंग्यावर कलमा लिहून मिरवणूक काढण्यात आली? जुना व्हिडिओ दिशाभूल करीत व्हायरल

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
तेलंगणात काँग्रेसचा विजय होताच तिरंगा ध्वजावर कलमा लिहिला गेला.
Fact
व्हायरल झालेला व्हिडिओ जून 2022 चा असून चुकीचा संदर्भ देऊन दिशाभूल केली जात आहे.

तेलंगणात काँग्रेसचा विजय होताच भारताच्या ध्वजावर कलमा लिहिल्याचा दावा करत एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. झी न्यूजच्या डीएनए शोची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये तेलंगणात काही लोकांनी तिरंग्याचा अपमान केला आणि त्यावर इस्लामी मंत्र ‘कलमा’ लिहिल्याचा उल्लेख आहे.

तथापि, आमच्या तपासणीत, आम्हाला आढळले की ही व्हिडिओ क्लिप झी न्यूजच्या DNA मध्ये जून 2022 मध्ये प्रसारित झालेल्या रिपोर्टमधील आहे. खरं तर, 10 जून 2022 रोजी तेलंगणातील महबूब नगर जिल्ह्यात पैगंबर मुहम्मद यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल नुपूर शर्मा यांच्या विरोधात हे निदर्शन आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये तिरंग्याशी छेडछाड करण्यात आली होती. त्या काळात राज्यात तेलंगणा राष्ट्र समितीचे सरकार होते.

3 डिसेंबर रोजी झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसला 64 जागा मिळाल्या. या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याचवेळी सत्ताधारी पक्ष टीआरएसला 119 जागांपैकी केवळ 39 जागा मिळाल्या. भाजपला 8 तर असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष AIMIM ला 7 जागा मिळाल्या. भारतीय कम्युनिस्ट पक्षालाही 1 जागा मिळाली आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ 48 सेकंदांचा आहे. या व्हिडिओमध्ये झी न्यूजच्या डीएनए शोमध्ये काही लोक अशोक चक्राऐवजी अरबी भाषेत लिहिलेल्या तिरंगा ध्वजासह निषेध व्यक्त करताना दिसत आहेत. यादरम्यान अँकर सुधीर चौधरीही या सीनबद्दल बोलताना दिसत आहेत की, तेलंगणातील आंदोलकांनी तिरंग्यात अशोक चक्राच्या जागी कलमा लिहिला आहे.

हा व्हिडीओ इंस्टाग्राम वर शेयर करीत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तेलंगणात काँग्रेसचा विजय होताच भारताच्या ध्वजावर कलमा लिहिला गेला, ठरवा तुम्हीच मग कोणाला मतदान करायचं ते !”

Fact Check: तेलंगणात काँग्रेसच्या विजयानंतर तिरंग्यावर कलमा लिहून मिरवणूक काढण्यात आली? जुना व्हिडिओ दिशाभूल करीत व्हायरल
Courtesy: Instagram@mhpattern

या पोस्टचे संग्रहण येथे पाहता येईल.

याच पोस्टच्या लिंकसह समान दावा फेसबुकवरही झाल्याचे आमच्या निदर्शनास आले.

Fact Check: तेलंगणात काँग्रेसच्या विजयानंतर तिरंग्यावर कलमा लिहून मिरवणूक काढण्यात आली? जुना व्हिडिओ दिशाभूल करीत व्हायरल
Courtesy: Facebook/ Dilip Dhoble

Fact Check/Verification

न्यूजचेकरने दाव्याची पडताळणी करण्यासाठी प्रथम व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला. व्हिडिओमध्ये सुधीर चौधरी अँकरची भूमिका साकारत असल्याचे आम्हाला आढळले. यावरून हे स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडिओ क्लिप अलीकडील नाही, कारण सुधीर चौधरी यांनी झी न्यूजचा राजीनामा दिला होता आणि जुलै 2022 मध्ये आजतक वृत्तवाहिनीमध्ये प्रवेश केला होता.

यानंतर आम्ही व्हायरल व्हिडिओचे मोठे व्हर्जन स्कॅन करण्यास सुरुवात केली. Google वर काही कीवर्ड शोधताना, आम्हाला झी न्यूजच्या अधिकृत YouTube खात्यावर 10 जून 2022 रोजी अपलोड केलेल्या व्हिडिओची मोठी आवृत्ती आढळली.

Fact Check: तेलंगणात काँग्रेसच्या विजयानंतर तिरंग्यावर कलमा लिहून मिरवणूक काढण्यात आली? जुना व्हिडिओ दिशाभूल करीत व्हायरल
Courtesy: YT/ Zee News

सुमारे 1 तासाच्या या व्हिडिओतील सुमारे 33 मिनिटे 15 सेकंदात आम्ही व्हायरल झालेल्या व्हिडिओचा भाग पाहिला, ज्यात अँकर सुधीर चौधरी सांगत आहेत की तेलंगणातील महबूबनगरमध्ये नुपूर शर्माच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांनी तिरंग्यातून अशोक चक्र काढून टाकले आणि ध्वजावर कलमा लिहिला. व्हिडिओ पाहिल्यावर, आम्हाला आढळले की सुधीर चौधरी यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीनंतर या कार्यक्रमात झालेल्या निषेधाचा उल्लेख केला होता.

तपासादरम्यान, आम्हाला इंडिया टीव्हीच्या यूट्यूब अकाऊंटवर महबूबनगर, तेलंगणात तिरंग्याच्या अपमानाशी संबंधित व्हिडिओ रिपोर्ट देखील सापडला. 10 जून 2022 रोजी इंडिया टीव्हीच्या YouTube खात्यावर हा व्हिडिओ रिपोर्ट अपलोड करण्यात आला होता. तेलंगणातील महबूबनगरमध्ये निदर्शनादरम्यान तिरंग्याची विटंबना करण्यात आली आणि अशोक चक्राच्या जागी कलमा लिहिण्यात आल्याचेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

Fact Check: तेलंगणात काँग्रेसच्या विजयानंतर तिरंग्यावर कलमा लिहून मिरवणूक काढण्यात आली? जुना व्हिडिओ दिशाभूल करीत व्हायरल
Courtesy: YT/ India TV

तपासादरम्यान, आम्हाला 10 जून 2022 रोजी डेक्कन क्रॉनिकल वेबसाइटवर प्रकाशित झालेला रिपोर्ट देखील सापडला. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याविरोधात महबूबनगरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर आंदोलन करण्यात आल्याचेही या वृत्तात सांगण्यात आले आहे. यावेळी आंदोलकांनी तिरंग्यातून अशोक चक्र काढून त्यावर कलमा लिहिला होता.

Fact Check: तेलंगणात काँग्रेसच्या विजयानंतर तिरंग्यावर कलमा लिहून मिरवणूक काढण्यात आली? जुना व्हिडिओ दिशाभूल करीत व्हायरल
Courtesy: Deccan Chronicle

गुगल मॅपच्या साहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ठिकाणाचा शोध घेतल्यानंतर महबूबनगर जिल्ह्यातील क्लॉक टॉवरजवळ ही घटना घडल्याचे आम्हाला आढळले. खालील चित्रांच्या मदतीने तुम्ही हे सहज समजू शकता. दोन्ही चित्रांमध्ये तुम्हाला एकाच प्रकारचे होर्डिंग दिसेल.

Fact Check: तेलंगणात काँग्रेसच्या विजयानंतर तिरंग्यावर कलमा लिहून मिरवणूक काढण्यात आली? जुना व्हिडिओ दिशाभूल करीत व्हायरल

आमचा तपास मजबूत करण्यासाठी आम्ही महबूबनगर पोलिसांशीही संपर्क साधला. त्या भागातील एसडीपीओ टी महेश यांनी आम्हाला सांगितले की, “ही घटना गेल्या वर्षीच घडली होती. 10 जून 2022 रोजी क्लॉक टॉवरजवळ निदर्शनादरम्यान काही लोकांनी तिरंग्यातून अशोक चक्र काढून त्यावर अरबी भाषेत काहीतरी लिहिले होते. ही माहिती मिळताच आम्ही तात्काळ ध्वज जप्त केला आणि तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.”

Conclusion

आमच्या तपासात मिळालेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल व्हिडिओ क्लिप जून 2022 मध्ये महबूबनगरमध्ये नुपूर शर्माविरोधात झालेल्या निदर्शनाची आहे.

Result: Missing Context 

Our Sources
Zee News YouTube Account: Video Uploaded on 10th June 2022
India TV YouTube Account: Video Uploaded on 10th June 2022
Deccan Chronicle Website: Article Published on 11th June 2022
Telephonic Conversation With Mahbubnagar SDPO T Mahesh

(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम रुंजय कुमार यांनी केले आहे. ते येथे वाचता येईल.)

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Most Popular