Thursday, May 2, 2024
Thursday, May 2, 2024

HomeFact CheckFact Check: पुण्यात जातीद्वेष पसरविणारं पत्रक भाजपने जारी केलं आहे? येथे जाणून...

Fact Check: पुण्यात जातीद्वेष पसरविणारं पत्रक भाजपने जारी केलं आहे? येथे जाणून घ्या सत्य

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
जातीद्वेष पसरविणारं पत्रक भाजपने पुण्यात जारी केलं आहे.

Fact

असं कोणताही पत्रक भाजपने जारी केलेलं नाही. भाजपने याचा इन्कार केला आहे.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यास्थितीत राजकीय पोस्ट आणि एकमेकांवर टीका करणाऱ्या गोष्टी जास्त गतीने व्हायरल होत आहेत. यातच पुण्यात भाजप पक्षाने जातीद्वेष पसरविणारं एक पत्रक जारी केलं असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आम्हाला हा दावा व्हाट्सअपवर आढळला. महत्वाचे म्हणजे न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: पुण्यात जातीद्वेष पसरविणारं पत्रक भाजपने जारी केलं आहे? येथे जाणून घ्या सत्य

“बहुजन समाजातील अठरापगड जाती जमाती मधील. भारतीय जनता पार्टी मध्ये काम करणाऱ्या लोकांनी हा व्हिडिओ डोळे उघडे ठेवून आणि कान उघडे ठेवून पहावं आणि ऐकावं. शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या लोकांनी बीजेपीच्या पेशवाईला जाणून घ्या” अशा कॅप्शन सोबत एक व्हिडीओ प्रसारित करून हा दावा केला जात आहे.

Fact Check/ Verification

दाव्याची सत्यता तपासण्यासाठी आम्ही सर्वप्रथम “पुण्यात भाजपाचे जातीद्वेष पसरविणारे पत्रक” या किवर्डसच्या माध्यमातून शोध घेतला. मात्र आम्हाला यासंदर्भातील कोणतेही मीडिया रिपोर्ट्स मिळाले नाहीत.

दरम्यान या आशयाची पोस्ट मिळते का? हे पाहण्यासाठी आम्ही फेसबुकवर शोध घेतला असता, २१ एप्रिल २०१९ रोजी करण्यात आलेली एक पोस्ट आम्हाला मिळाली. त्यामध्ये व्हायरल पत्राचे छायाचित्र आणि त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून पत्राचा मुद्दा २०१९ पासूनचा असून सध्याचा नसल्याचे आमच्या निदर्शनास आले.

Fact Check: पुण्यात जातीद्वेष पसरविणारं पत्रक भाजपने जारी केलं आहे? येथे जाणून घ्या सत्य

“पुणे शहराच्या ब्राम्हण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अस्मितेसाठी भारतीय जनता पार्टी नेहमी कटिबद्ध राहिली आहे. पुणे शहरातून मराठा बहुजन दलित लोकांची मक्तेदारी मोडित काढण्यासाठी भाजप नेहमीच ब्राम्हण समाजाच्या सोबत आहे. ब्राम्हण अस्मितेसाठी आम्ही जिजाबाई, शाहू, फूले चे फोटोही पायदळी तुडवल्या. मराठा बहुजन दलितांचा पुण्यातून नायनाट करण्यासाठी आपले मत भाजप आणि मित्र पक्षालाच टाकावे” असे पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान आम्ही ते पत्र बारकाईने पाहिले असता, पत्रकात भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत. पहिल्या रांगेत तिसरा फोटो गोपीनाथ मुंडे यांचा आहे. तर दुसऱ्या ओळीमध्ये पहिला फोटो गिरिश बापट यांचा आहे. पत्रकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच फोटो नाही. पत्रकात दुसऱ्या रांगेमधील चौथा फोटो भाजपचे पुणे पूर्व शहर प्रदेशाध्यक्ष विकास मतकरी यांचा आहे. ते २०११ साली पुणे शहर प्रदेशाध्यक्ष होते. आदी नोंदी आम्हाला आढळल्या.

दरम्यान दाव्यासोबत शेयर करण्यात आलेला व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिला असता, आम्हाला त्यामध्ये TV9 मराठीचा लोगो आढळला. यावरून शोधले असता, या व्हायरल पत्रकाची सत्यता पडताळण्यासाठी TV9 मराठीने २३ एप्रिल २०१९ रोजी एक व्हिडीओ रिपोर्ट केला होता आणि हे पत्रक भाजपने जारी केलेले नसल्याचे स्पष्ट केले होते. हे आम्हाला पाहायला मिळाले.

संपूर्ण व्हिडीओ रिपोर्ट शेयर न करता त्याचा अर्धा भाग शेयर करण्यात आला असून दिशाभूल करण्याचाच हा प्रकार असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

दरम्यान आम्ही आमचा तपास अधिक बळकट करण्यासाठी पुणे भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्याशी संपर्क केला असता, “हे पत्र काही जणांचा खोडसाळपणा आहे. अशाप्रकारचे पत्र पुणे भाजपाने कधीही प्रसारित केलेले नाही. आमचा पक्ष सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन जातो. दरम्यान गैरसमज पसरवून दिशाभूल करणे आणि आपली पोळी भाजून घेणे यातला हा प्रकार आहे.” अशी माहिती त्यांनी दिली.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात व्हायरल दाव्यात दाखविले जाणारे पत्रक भाजपने जारी केलेले नसून ते खोटे आहे. स्वतः भाजप पक्षानेही याचा इन्कार केला आहे. हे स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Sources
Google search
Self Analysis
Video published by TV9 Marathi on April 23, 2019
Conversation with BJP Pune’s spokesperson Sandip Khardekar


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular