Authors
अयोध्या राम मंदिराशी जोडून दावे आणि इतर अनेक फेक दाव्यांनी मागील आठवडा गाजला. DMK खासदार कनिमोझी यांनी अयोध्या राम मंदिरासाठी 613 किलोची घंटा पाठवली, असा दावा करण्यात आला. 1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भारतात राम आणि कमळ असलेली नाणी आणली, असा दावा करण्यात आला. रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हिंदू समाजाच्या लोकांनी मारहाण केली, असा दावा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मालदीवमध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. असा दावा करण्यात आला. काँग्रेसने आपल्या वर्गणी जमा करण्याच्या योजनेसाठी सोनिया गांधी यांच्या फोटोचा वापर क्यू-आर कोडसाठी केला आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
कनिमोझी यांनी अयोध्या राम मंदिरासाठी 613 किलोची घंटा पाठवली?
DMK खासदार कनिमोझी यांनी अयोध्या राम मंदिरासाठी 613 किलोची घंटा पाठवली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
ईस्ट इंडिया कंपनीने भारतात राम आणि कमळ असलेली नाणी आणली का?
1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भारतात राम आणि कमळ असलेली नाणी आणली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरील हल्ला सध्याचा नाही
रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हिंदू समाजाच्या लोकांनी मारहाण केली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे उघड झाले आहे.
मालदीवमध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात झालेले आंदोलन जुने आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मालदीवमध्ये त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. असा दावा करण्यात आला. मात्र आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
काँग्रेसने जारी केला सोनिया गांधींच्या फोटोचा क्यू-आर कोड?
काँग्रेसने आपल्या वर्गणी जमा करण्याच्या योजनेसाठी सोनिया गांधी यांच्या फोटोचा वापर क्यू-आर कोडसाठी केला आहे. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा