Authors
जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही सोशल मीडियावर अनेक फेक दावे व्हायरल झाले. छत्रपती शिवरायांचे खरे चित्र असे सांगत एक चित्र व्हायरल करण्यात आले. महाविकास आघाडीच्या विजयोत्सवात श्रीरामपूरमध्ये पाकिस्तानी ध्वज फडकवण्यात आला, असा दावा करण्यात आला. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले, असा दावा करण्यात आला. धुळ्यात ४००० मतांनी पडलेला काँग्रेस उमेदवार फेरमोजणीनंतर ८००० मतांनी जिंकला आणि १२००० मतांचा घोळ झाला, असा दावा करण्यात आला. कंगना राणावतच्या गालावर उमटलेल्या थप्पडेच्या खुणेचा फोटो, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
हे छत्रपती शिवरायांचे खरे छायाचित्र नाही
छत्रपती शिवरायांचे खरे चित्र असे सांगत एक चित्र व्हायरल करण्यात आले, आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
महाविकास आघाडीच्या विजयोत्सवात श्रीरामपूरमध्ये फडकावला पाकिस्तानी ध्वज?
महाविकास आघाडीच्या विजयोत्सवात श्रीरामपूरमध्ये पाकिस्तानी ध्वज फडकवण्यात आला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या नवनीत राणा यांना अश्रू अनावर?
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे निदर्शनास आले.
धुळ्यात १२००० मतांचा घोळ झाला?
धुळ्यात ४००० मतांनी पडलेला काँग्रेस उमेदवार फेरमोजणीनंतर ८००० मतांनी जिंकला आणि १२००० मतांचा घोळ झाला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
ही कंगना राणावतच्या गालावर उमटलेली थप्पडेची खूण नाही
कंगना राणावतच्या गालावर उमटलेल्या थप्पडेच्या खुणेचा फोटो, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा