Authors
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही सोशल मीडियावर अनेक फेक दावे व्हायरल झाले. फोटोत अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोससोबत असलेली महिला मनमोहन सिंग यांची मुलगी आहे, असा दावा करण्यात आला. महाराष्ट्रात बलात्काराचा आरोपी हाफिज बेगला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर मुस्लिमांनी हल्ला केला, असा दावा करण्यात आला. जवाहरलाल नेहरूंनी एका मुलाखतीत कबूल केले होते की, भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांचा सहभाग नव्हता, असा दावा करण्यात आला. कर्नाटकात एका जैन साधूला मुस्लिमांनी मारहाण केली आणि काँग्रेस झिंदाबादच्या घोषणा दिल्या, असा दावा करण्यात आला. उद्धव ठाकरे म्हणाले की मला हिंदू मतांची गरज भासणार नाही, मुस्लिम मतांवरच विधानसभा जिंकू, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहायला मिळतील.
या फोटोत जॉर्ज सोरोससोबत असलेली महिला मनमोहन सिंग यांची मुलगी आहे?
फोटोत अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोससोबत असलेली महिला मनमोहन सिंग यांची मुलगी आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
बलात्काराचा आरोपी हाफिज बेगला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर मुस्लिमांनी हल्ला केला?
महाराष्ट्रात बलात्काराचा आरोपी हाफिज बेगला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर मुस्लिमांनी हल्ला केला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग नसल्याचे नेहरूंनी कबूल केले?
जवाहरलाल नेहरूंनी एका मुलाखतीत कबूल केले होते की, भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांचा सहभाग नव्हता, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कर्नाटकात एका जैन साधूला मुस्लिमांनी मारहाण करून काँग्रेस झिंदाबादच्या घोषणा दिल्या?
कर्नाटकात एका जैन साधूला मुस्लिमांनी मारहाण केली आणि काँग्रेस झिंदाबादच्या घोषणा दिल्या, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
उद्धव ठाकरे म्हणाले की मला हिंदू मतांची गरज भासणार नाही?
उद्धव ठाकरे म्हणाले की मला हिंदू मतांची गरज भासणार नाही, मुस्लिम मतांवरच विधानसभा जिंकू, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा