Friday, October 11, 2024
Friday, October 11, 2024

HomeFact CheckFact Check: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारवर केली नाही टीका,...

Fact Check: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारवर केली नाही टीका, जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याच्या केंद्र सरकारवर टीका केली आहे.

नितीन गडकरी एका व्हिडिओमध्ये मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहेत. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मोदी सरकार ने 10 वर्ष में क्या किया- सुन लीजिए नितिन गडकरी से.” वीडियो में नितिन गडकरी कह रहे हैं कि ”आज गांव, गरीब, मज़दूर और किसान दुखी हैं। इसका कारण यह है कि जल, जमीन, जंगल और जानवर – रूरल, एग्रीकल्चर और ट्राइबल की जो इकॉनमी है: यहाँ अच्छे रोड नहीं हैं। पीने के लिए शुद्ध पानी नहीं है। अच्छे अस्पताल नहीं हैं। अच्छे स्कूल नहीं हैं। किसान की फसल को अच्छे भाव नहीं हैं।”

Fact Check: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारवर केली नाही टीका, जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य
Courtesy: Instagram/@meraapnarahul

ही क्लिप काँग्रेस पक्षाच्या अधिकृत X हँडलनेही शेअर केली आहे.

Fact

व्हिडिओ नीट पाहिल्यास लल्लनटॉपचा लोगो आणि ‘जामघाट’ असे लिहिलेले दिसत आहे. दाव्याची चौकशी करण्यासाठी, सर्वप्रथम आम्ही लल्लनटॉप, जामघाट आणि नितीन गडकरी हे कीवर्ड शोधले, ज्याचा परिणाम म्हणून आम्हाला ‘द लल्लनटॉप’ च्या यूट्यूब चॅनेलवर 29 फेब्रुवारी 2024 रोजी नितीन गडकरींचा मुलाखतीचा व्हिडिओ मिळाला.‘नितिन गडकरी इंटरव्यू में पीएम मोदी से खटास, अगले पीएम पर सौरभ द्विवेदी से क्या बोले?’  अशा कॅप्शनसह शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये व्हायरल क्लिपचा भाग 18:20 मिनिटांनी पाहता येतो.

Courtesy: Lallantop

व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला आढळले की व्हायरल व्हिडिओ क्लिप केलेला आहे. नितीन गडकरी मुलाखतीत बोलत होते की, ‘.. जब गांधी थे तब 90 प्रतिशत आबादी गाँवों में रहती थी.. और धीरे-धीरे 30 प्रतिशत का माइग्रेशन (पलायन) क्यों हुआ?’ ते पुढे म्हणतात, ”इसका कारण.. आज गांव, गरीब, मज़दूर और किसान दुखी हैं। इसका कारण यह है कि जल, जमीन, जंगल और जानवर – रूरल, एग्रीकल्चर और ट्राइबल की जो इकॉनमी है : यहाँ अच्छे रोड नहीं हैं। पीने के लिए शुद्ध पानी नहीं है। अच्छे अस्पताल नहीं हैं। अच्छे स्कूल नहीं हैं। किसान की फसल को अच्छे भाव नहीं हैं।” याच क्रमाने ते पुढे म्हणतात, ”हमारी सरकार आने पर हम इस दिशा में बहुत काम कर रहे हैं।” यानंतर त्यांनी आपल्या सरकारच्या अनेक चांगल्या कृतीही सांगितल्या. यावरून त्यांचा अपूर्ण व्हिडिओ शेअर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नितीन गडकरी यांनीही त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून हा दावा फेटाळला आहे. या क्लिपबाबत नितीन गडकरी यांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीसही पाठवली आहे.

Fact Check: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारवर केली नाही टीका, जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य
Courtesy: X/@OfficeOfNG

अशाप्रकारे, नितीन गडकरींचा अपूर्ण व्हिडिओ दिशाभूल करीत शेअर केला जात असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

Result: Missing Context

Sources
Video Interview shared by Lallantop on 29th February 2024.
Post from the official X handle Nitin Gadkari.


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular