Authors
मागील आठवड्यातही सोशल मीडियावर फेक दावे पाहायला मिळाले. भाजपचा जास्त पुळका करू नका. भाषणात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा समाज आणि मतदारांची गरज नाही, असा दावा करण्यात आला. मोबाईल गेम ॲपचा प्रचार करणारी जाहिरात अभिनेता अक्षय कुमारने केली, असा दावा करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही युवावस्थेतील छायाचित्रे आहेत असा दावा करण्यात आला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची नक्कल शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केली, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
मराठा समाज आणि मतदारांची गरज नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले?
भाजपचा जास्त पुळका करू नका. भाषणात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा समाज आणि मतदारांची गरज नाही, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला.
मोबाईल गेम ॲपचा प्रचार करणारी जाहिरात अभिनेता अक्षय कुमारने केली?
मोबाईल गेम ॲपचा प्रचार करणारी जाहिरात अभिनेता अक्षय कुमारने केली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही युवावस्थेतील छायाचित्रे आहेत?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही युवावस्थेतील छायाचित्रे आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
भास्कर जाधवांनी नक्कल केल्याचा व्हिडीओ जुना
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची नक्कल शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा